मुंबई. अभिनेता अजय देवगणने भारत सरकारच्या आरोग्य सेतू अॅपचे कौतुक केले आहे. बुधवारी त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो वर्कआउट करताना आणि स्वत: चा बॉडीगार्ड असे वर्णन करणार्या स्वत:चे एक पात्र सेतूशी संवाद साधत असल्याचे दिसतोय. सेतू अजयला सांगत आहे की, तो एक वेगळ्या प्रकारचा बॉडीगार्ड आहे. सेतूने इतर अनेक फायदे सांगताना म्हटले की, भारत सरकारने 130 कोटी भारतीयांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक बॉडीगार्ड बनवला आहे.
अजय यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अजयने पीएमओ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले, “कोविड 19 सोबत लढण्यासाठी प्रत्येक भारतीयांना त्यांचा वैयक्तिक अंगरक्षक दिल्याबद्दल धन्यवाद… सेतू माझा बॉडीगार्ड आहे आणि तुमचाही.” पंतप्रधान मोदींनी त्याच्या ट्विटचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट केले, “अजय देवगण बरोबर म्हणाले. आरोग्य सेतू आपले, आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे रक्षण करते.”कोरोना व्हायरसच्या धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारनं हे अॅप तयार केले आहे. हा अॅप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरसबाबतच्या धोक्यापासून अलर्ट करेल आणि तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात की नाही हेदेखिल सांगेल. या अॅपचे वैशिष्ट्य असे की, अॅप लाँच केल्यानंतर काही दिवसांतच ते एक कोटीहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरमधून मोफत डाऊनलोड करू शकता. हे अॅप 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.