मंदिरांची नगरी भुबनेश्वर आणि पुण्य नगरी पुणे यांच्या दरम्यान थेट सेवा सुरु करणारी एकमेव एअरलाईन
पुणे-: भारतीय आकाशांमध्ये सर्वोत्तम ऑन-टाईम परफॉर्मन्स (साधी सरासरी डीजीसीए २०२० अहवालानुसार) नोंदवत २०२० ला निरोप दिल्यानंतर एअरएशिया इंडियाने कोलकाता, भुबनेश्वर आणि पुणे या शहरांना जोडणाऱ्या नव्या विमानसेवा सुरु करत नव्या वर्षात दमदार पदार्पण केले आहे. अशाप्रकारे भुबनेश्वर आणि पुणे शहरांच्या दरम्यान थेट / विना-थांबा विमानसेवा देणारी एकमेव एअरलाईन बनल्यामुळे एअर एशिया इंडियाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या सेक्टर्ससाठी तिकिटांची विक्री सुरु झाली असून विमानसेवा २४ जानेवारी २०२१ पासून सुरु होत आहेत.
विमाने २४ जानेवारी २०२१ पासून सुरु होत आहेत:
विमान क्रमांक | पासून | पर्यंत | वारंवारता (आठवड्यातून सहा दिवस) |
I5 911 | कोलकाता | भुबनेश्वर | सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार |
I5 911 | भुबनेश्वर | पुणे | सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार |
I5 912 | पुणे | भुबनेश्वर | सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार |
I5 912 | भुबनेश्वर | कोलकाता | सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार |
एअरएशिया इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. अंकुर गर्ग यांनी सांगितले, “कोलकाता, भुबनेश्वर आणि पुणे या शहरांना जोडणाऱ्या नव्या विमानसेवा सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कोलकाता आणि पुणे यांना जोडणाऱ्या आमच्या फ्लाय-थ्रू सेवेमार्फत विमानसेवा अधिक जास्त सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने या फ्लाईट्स ठरवण्यात आल्या आहेत. १ ऑगस्ट २०१७ रोजी एअरएशिया इंडियाने भुबनेश्वरहून कामकाजाला सुरुवात केली आणि आता बंगलोर, मुंबई, नवी दिल्ली व कोलकाता या आमच्या चार मुख्य केंद्रांना भुबनेश्वर जोडले गेले आहे. लॉकडाउनच्या काळात लोकांना आपल्या घरी सुरक्षित पोहोचता यावे यासाठी सुरु करण्यात आलेल्या उम्मीद की उडान या आमच्या उपक्रमांतर्गत कोची, मुंबई, इंफाळ, गुवाहाटी, बागडोगरा, जम्मू आणि पोर्ट ब्लेअर यांच्यासह देशभरातील विविध शहरांमधून ओडिशापर्यंत सेवा उपलब्ध करवून देऊन राज्य सरकारे आणि इतरांसोबत काम करत आम्ही आमचे संबंध अधिक दृढ केले आहेत.”
प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत या एअरलाईनने २०२० मध्ये १८६ आसनी एअरबस ए३२० निओ ही तीन विमाने आपल्या ताफ्यात दाखल केली. सुरक्षित प्रवासाची सेवा वृद्धिंगत करण्यासाठी वैविध्यपूर्ण सेवा आणणाऱ्या एअरएशिया इंडियाने नुकतीच ‘एक्सट्रा सीट‘ ही नवी सेवा सुरु केली. यामध्ये प्रवाशांना एक अतिरिक्त सीट रिझर्व्ह करता येते व सुरळीत व आरामदायी विमान प्रवासाचा अनुभव घेता येतो. ही सेवा एअरएशिया इंडियामार्फत संचालित केल्या जाणाऱ्या सर्व विमानांमध्ये घेता येते आणि ज्यांना विमानात बसताना काही विशेष गरजा असतात किंवा ज्यांना आपल्यासोबत काही नाजूक, वैयक्तिक गोष्टी न्यायच्या असतील किंवा ‘स्वतःचा’ खास वेळ हवा असेल अशा प्रवाशांसाठी ही सेवा अगदी योग्य आहे. लहान बाळासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना ‘एक्स्ट्रा सीट’ बुक करून त्यावर कॅरी कॉट ठेवता येईल आणि स्वतःसाठी, बाळासाठी विमानप्रवास अधिक जास्त सुखकर बनवता येईल. एअरएशिया इंडियाने एविस कार रेंटल सर्विसेससोबत देखील सहयोग केला आहे. एविसच्या मध्यम, प्रीमियम, लक्झरी आणि एसयुव्ही गाड्यांच्या ताफ्यामधून एअरपोर्ट ट्रान्सफर्स, शोफर सेवेसहित वाहने, दीर्घकालीन कार रेंटल्स किंवा स्वतः चालवून नेण्यासाठी कार अशा सेवा प्रवाशांना सहज मिळवता येतील.
बंगलोर, नवी दिल्ली आणि मुंबई यांच्या बरोबरीनेच कोलकाता हे देखील एअरएशिया इंडियाचे एक प्रमुख केंद्र आहे. किफायतशीर प्रवास सेवा उपलब्ध करवून देण्याचे उद्धिष्ट असलेल्या या एअरलाईनने देशभरातील आपल्या नेटवर्कला अधिक जास्त मजबूत करण्यासाठी कितीतरी नवे रूट्स नुकतेच सुरु केले आहेत. सध्या एअरएशिया इंडियामध्ये कोलकाता शहराला बंगलोर, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, इंफाळ, बागडोगरा, भुबनेश्वर आणि चेन्नई या शहरांसोबत जोडणाऱ्या विमानसेवा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे भुबनेश्वर आणि बंगलोर, नवी दिल्ली, मुंबई व पुणे यांना जोडणाऱ्या आणि पुणे शहराला जयपूर, नवी दिल्ली, भुबनेश्वर व बंगलोर यांना जोडणाऱ्या विमानसेवा देखील ही एअरलाईन चालवते. पुणे – जयपूर विमानसेवा ही एअरएशिया इंडियाची आणखी एक अनोखी सेवा आहे, या हवाईमार्गावर सेवा देणारी ही एकमेव एअरलाईन आहे.
एअरएशिया इंडिया
बंगलोर येथे मुख्यालय असलेली एअरएशिया (इंडिया) लिमिटेड ही टाटा सन्स लिमिटेड व एअरएशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडसहित एअरएशिया यांच्या संयुक्त भागीदारीतील कंपनी आहे. एअरएशिया इंडियाची सुरुवात १२ जून, २०१४ रोजी झाली. सध्या त्यांच्या ताफ्यात ३३ ए३२० विमाने असून भारतातील १९ ठिकाणी त्यांच्या सेवा पुरवल्या जातात. ‘फॉर एव्हरीवन‘ (‘प्रत्येकासाठी‘) हे ब्रँड घोषवाक्य असलेली ही एअरलाईन आपल्या प्रवाशांना आरामदायी लेदर सीट्स, वैविध्यपूर्ण निवडीला वाव असलेले गरमागरम जेवण, खास लॉयल्टी मेंबर बेनिफिट्स असे अनेक लाभ देते. स्वप्ने पाहण्याची हिम्मत ठेवा, प्रवाशांना सेवा पुरवण्यासाठी तत्पर राहा, लोकांचा विचार सर्वात आधी, कायम सुरक्षितता बाळगा, प्रत्यक्षात करून दाखवा, वन एअरएशिया आणि शाश्वतता या मूलभूत मूल्यांच्या आधारे एअरएशिया भक्कम उभी आहे.
संचालनात्मक कार्यक्षमता आणि प्रवाशांना प्रदान केला जाणारा अनुभव यामध्ये वाढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या एअरलाईनने एक मल्टीट्युड सुरु केले असून यामध्ये डिजियात्रा बायोमेट्रिक आणि बंगलोरमधील त्यांच्या केंद्रापासून संपर्करहित प्रवास अनुभव, बंगलोर, नवी दिल्ली आणि हैदराबादमध्ये एअरएशिया फ्लायपोर्टर डोअर टू डोअर बॅगेज डिलिव्हरी सेवा; रेड कार्पेट प्रायॉरीटी चेक-इन, बोर्डिंग आणि बॅगेज सेवा व एव्हीए (एअरएशिया व्हर्च्युअल ऑलस्टार) हे व्हाट्सअप व airasia.com वर उपलब्ध असलेले बहुभाषिक चॅटबॉट या सुविधा आहेत.