अग्नि दमन-22 : नागरी-लष्करी संस्थांनी एकत्र येऊन अग्निशमनाचा केला अभ्यास

Date:

पुणे, 30 एप्रिल 2022

उन्हाळा आणि अनेक ठिकाणी असलेल्या उच्च तापमानामुळे पुणे आणि आसपासच्या परिसरात, सध्या आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.या पार्श्वभूमीवर, आगीचा सामना करण्यासाठी लोकांची जनजागृती करणे आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच, नागरी आणि लष्करी यांच्यासह सर्व यंत्रणांच्या क्षमता तपासून बघण्यासाठी प्रत्यक्ष अभ्यासाची गरज आहे. हे लक्षात घेऊन, अग्नि दमन-22 हा परस्पर सहकार्याचा अग्निशमन अभ्यास उपक्रम राबवण्यात आला, पुण्यात, आज, लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली देहू मार्गावरील, 29 फील्ड अॅम्युनेशन डेपो परिसरात हा संयुक्त अभ्यास झाला.  

यात एकूण 35 अग्निशमन पथके सहभागी झाली होती. ज्यात, 12 नागरी संस्था, जसे एनडीआरएफ, एसडीआरएफ, आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवडचा अग्निशमन विभाग, पीएमआरडीए आकुर्डी , एमआयडीसी तळेगाव, तळेगाव दाभाडे नगर परिषद, चाकण नगरपरिषद, भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन विभाग, टाटा मोटर्स लिमिटेड, महिंद्रा व्हेईकल लिमिटेड आणि बजाज ऑटो यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी कवायती आणि आग लागल्यास त्वरित प्रतिसाद देणे, याची रंगीत तालिम समन्वयातून करण्यात आली होती.

पुण्यात नागरी आणि सैन्य आस्थापनांकडे उपलब्ध असलेल्या सर्व अग्नीशामक स्रोतांचे एकत्रिकरण करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास अतिशय महत्वाचा होता. अग्नी दमन – 22 सरावाच्या निमित्ताने केंद्र/राज्य सरकारच्या संस्थांना एकत्रित प्रयत्न करून तसेच अग्निशमन क्षेत्रातील मनुष्यबळाला किमान वेळात बाधित क्षेत्रात कमाल मदत पोहचवून मौल्यवान जीव आणि संपत्तीचे रक्षण कसे करावे हे शिकण्याची संधी मिळाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...