विकास आराखडा विषयक जनजागृतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे डीपीविरोधात आंदोलन
पुणे :
‘राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्य समितीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेल्या विकास आराखड्यामुळे (डीपी) शहराचे नुकसान होणार आहे. समितीने 381 आरक्षणे रद्द केली असून, सुमारे 458 हेक्टर जमिनीचे निवासीकरण केले आहे. या डीपीला मान्यता दिल्यास पुणेकरांना त्याची किंमत चुकवावी लागणार आहे, या आराखड्याच्या विरोधात महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँगे्रस पक्षाने एकत्र येऊन आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सात विधानसभा मतदारसंघांमध्ये आंदोलने होणार आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस आणि कॉग्रेस पक्ष एकत्र येऊन आंदोलने करणार आहेत’, असे कसबा विधानसभा मतदारसंघ- टिळक पुतळा येथे आज सकाळी 10.00 वाजता झालेल्या आंदोलनावेळी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.
आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराधयक्षा खासदार अॅड. वंदना चव्हाण, अशेक राठी, अॅड. म.वि.अकोलकर, दिपक मानकर, प्रशांत जगताप, अप्पा रेणूसे, विनायक हनमघर, बाळासाहेब बोडके, बंडू केमसे, आश्विनी कदम, राजलक्ष्मी भोसले, रुपाली चाकणकर, मनाली भिलारे, बबलू जाधव, काँग्रेसचे अभय छाजेड, मोहन जोशी, प्रदीप रणपिसे, कमल व्यवहारे, शिवरकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विधानसभा मतदारसंघ नियोजित आंदोलने पुढील प्रमाणे : सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी शिवाजीनगर- बालगंधर्व चौक, मंगळवार दिनांक 19 जानेवारी रोजी- वडगावशेरी- येरवडा चौक, बुधवार दिनांक 20 जानेवारी रोजी कोथरुड – नळ स्टाँप, गुरुवार दिनांक 21 जानेवारी रोजी – हडपसर- गाडीतळ, शुक्रवार दिनांक 22 जानेवारी रोजी – पर्वती- उत्सव चौक, शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी – कँनटोन्मेंट -बोलाई चौक.