मुंबई—राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनकरुन विचारपूस केल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे. “तुम्ही योद्धे आहात, तुम्हाला लढायचे आहे.” असे मोदी यांनी शरद पवारांना सांगितल्याचे कळते आहे.
खासदार शरद पवार यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना स्वत: ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे. ट्विटमध्ये पवार यांनी म्हटले आहे की, “मला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ला माझ्यावर उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांना आपली कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.” असे ट्विट करत पवारांनी आवाहन केले आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 40 हजार नवे रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोविड-19 चे 40805 नवीन रुग्ण आढळले आहेत. 44 लोकांचा मृत्यू झाला असून 27,377 रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारच्या तुलनेत नवीन प्रकरणे 5588 कमी आहेत. शनिवारी राज्यात 46,393 रुग्ण आढळले होते. 30,795 रुग्ण बरे झाले आणि 48 लोकांचा मृत्यू झाला होता. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 2.93 लाख झाली आहे.
आतापर्यंत एकूण 75.07 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 70.67 लाख लोक बरे झाले आहेत, तर 142115 लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हिटी दर 20.90% आहे. याच्या एक दिवस आधी, शनिवारी पॉझिटिव्हिटी दर 20.77% होता. ज्यामध्ये मुंबईत 2,550 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. सक्रिय प्रकरणे 19,808 आहेत.