पुणे- कर्वे समाज सेवा संस्था पुणे देशातील समाजकार्याचे शिक्षण देणारी एक नामवंत व अग्रगण्य अशी शैक्षणिक संस्था असून, न्याक मानाकिंत ‘अ’ दर्जा प्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्नित आहे. यावर्षीची एम. एस. डब्लू.- समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, दोन वर्षाच्या, पूर्ण वेळ तसेच सेमेस्टर व चाइस बेस क्रेडीट सिस्टमवर आधारित असणाऱ्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्व्भूमीनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये प्रवेश परिक्षा होणार असल्याची माहिती संस्थेचे प्र संचालक डॉ मह्रेश ठाकूर यांनी दिली आहे.
संस्थेचे प्र संचालक डॉ मह्रेश ठाकूर यांनी दिलेल्या माहिती नुसार प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याकरिता –www.karve-institute.org या वेबसाईटवर ०१ जुलै २०२० पासून उपलब्ध झाले असून, ऑनलाईन पद्दतीने अर्ज करून त्याची प्रत पोस्टाद्वारे महाविद्यालायाच्या कार्यालयात जमा करता येणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. ३१ जुलै २०२० असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लेखी परीक्षा व मुलाखतींच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या नसून याबाबत विद्यार्थ्यांना वेबसाईट वरून कळविण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षा ही ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतली जाण्याची शक्यता असून यावर्षी ऑनलाईन किंवा प्रत्यक्षपणे पद्धतीने लेखी परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच २०२० मध्ये पदवी परीक्षा दिलेले विद्यार्थी पात्र असून ते ३१ जुलै पर्यंत प्रवेश अर्ज करू शकतात तसेच पुणे विद्यापिठाच्या पदवीधराना नियमानुसार प्राध्यान्य दिले जाते असेही त्यांनी सांगितले.
बदलत्या काळाची गरज आणि जागतिक परिस्थीचा विचार करता, कर्वे समाज सेवा संस्थेने, एम.एस.डब्लू. चॉईस आधारित क्रेडीट सिस्टमवर आधारित अभ्यासक्रम प्रशिक्षण देत असून, या अभ्यासक्रमात एकूण चार स्पेशलायझेशनचा समावेश आहे- कुटुंब व बाल कल्याण, मानव संसाधन व्यवस्थापन, वैद्यकिय व मानसोपचार समाजकार्य, आणि शहरी व ग्रामीण समुदाय विकास याचा यामध्ये समावेश आहे. एम.एस. डब्लू. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शासकीय, खाजगी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक विविध क्षेत्रात बऱ्याच व्यावसायिक व नौकरीच्या संधी उपलब्ध असून, सामाजिक विकास, कुटुंब व बाल कल्याण संस्थामध्ये समुपदेशक, समन्वयक, मानव संसाधन व्यवस्थापनात, कामगार कल्याण किंवा कार्मिक प्रबंधक, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकिय व मानसोपचार समाजकार्य, हॉस्पिटल, कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्र, आणि शहरी व ग्रामीण समुदाय विकास प्रकल्प, सी.एस. आर प्रकल्प अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन संस्था इ.ठिकाणी विविध नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतात.
कर्वे समाज सेवा संस्था ही समाजकार्यामधील सर्वोत्तम दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता आणि उत्तम क्षेत्रकार्य प्रशीक्षणासाठी ओळखली जाते तसेच प्रशिक्षण आणि कौशल्य विकास हा एम.एस.डब्लू.अभ्यासक्रमाचा अविर्भाज्य अंतर्भूत घटक आहे. संस्थेच्यावतीने दरवर्षी समाजकार्य अभ्यासक्रमा बरोबरच सी.एस.आर. डिप्लोमा, सी.एस.आर. सर्टिफिकेट, (आय.आय.सी.ए., कार्पोरट मिनिस्ट्री, केंद्र शासन, मान्यताप्राप्त),मानसिक आरोग्य समस्या आणि समुपदेशन, प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील चालविले जातात. एम. एस. डब्लू अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती संस्थेच्या kinss-institute.org.com, या वेबसाइट वर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी कर्वेनगर येथील वनदेवी मंदिराशेजारील कर्वे समाज सेवा, १८, हीलसाईड, कर्वेनगर, पुणे ४११०५२, येथील कार्यालयाशी दूरध्वनी: ७५१७५६४२१०/७५१७८३५४३१ किंवा Email ID is – kinsspune@gmail.com, येथे संपर्क करण्यात यावा असे आवाहन प्र संचालक डॉ मह्रेश ठाकूर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.