पुणे, 27 सप्टेंबर 2021: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित 18व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या फेरीअखेर पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंत याने आपली आघाडी कायम ठेवत 8 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे, पुणे येथे।पार पडलेल्या या स्पर्धेत पुण्याच्या फिडे मास्टर आदित्य सामंतने रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णीचा पराभव करून विजेतेपद पटकावले. आदित्य याने किंग्स पॉन पद्धतीने खेळास सुरुवात केली व 45 चालीमध्ये मात केली. 15 वर्षीय आदित्य हा अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम शाळेत 10वी इयत्तेत शिकत आहे. अहमदनगरच्या फिडे मास्टर सुयोग वाघने 7.5 गुणांसह 51 बुकोल्स कट गुणसरासरीच्या जोरावर दुसरा तर, आकाश दळवीने तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या आदित्य सामंतला 15000रुपये व करंडक उपविजेत्या 10000रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला 7000रुपये, चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला 5000रुपये आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला 3000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटरचे संचालक डॉ. सतीश ठिगळे, पीडीसीसीचे सहसचिव शेखर जोरी, कल्याणी शार्पचे निवृत्त सरव्यवस्थापक चंद्रकांत मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, राजेंद्र शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते. विनिता श्रोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी फिडेचा नॉर्म मिळविल्याबद्दल जेजुरीच्या आर्बीटर सारिका साबळे यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: नववी फेरी(व्हाईट व ब्लॅक क्रमानुसार):
एफएम आदित्य सामंत(पुणे)(8गुण)वि.वि.आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(रेल्वे)(7गुण);
आकाश दळवी(ठाणे)(7.5गुण)वि.वि.आयएम समीर काठमाळे(सांगली)(6.5गुण);
आदित्य बारटक्के(ठाणे)(6.5गुण)पराभूत वि.एफएम सुयोग वाघ(अहमदनगर)(7.5गुण);
सिद्धांत गायकवाड(पुणे)(6.5गुण)पराभूत वि.गौरव झगडे(पुणे)(7.5गुण);
डब्लूआयएम आकांक्षा हगवणे(पुणे)(6.5गुण)पराभूत वि.वेदांत पानेसर(मुंबई उपनगर)(7गुण);
निर्गुण केवल(पुणे)(7गुण)वि.वि.प्रतीक गेंगजे(रायगड)(6गुण);
ओम लामकाने(पुणे)(6.5गुण)बरोबरी वि.रिषभ गोखले(6.5गुण);
देवांश शहा(मुंबई उपनगर)(6.5गुण)बरोबरी वि.नमित चव्हाण(पुणे)(6.5गुण);
अंजनेया फाटक(पुणे)(6.5गुण)बरोबरी वि.अखिलेश नागरे(अहमदनगर)(6गुण);
एफएम कशिश जैन(पुणे)(6.5गुण)वि.वि.सीएम कुश भगत(मुंबई शहर)(5.5गुण);
दक्षराज बोले(पुणे)(5.5गुण)पराभूत वि.निलेश माळी(पालघर)(6.5गुण);
नील काकडे(पुणे)(5.5गुण)पराभूत वि.पार्ष गाला(ठाणे)(6.5गुण);
विकास शर्मा(पुणे)(6गुण)वि.वि.दर्श शेट्टी(मुंबई उपनगर)(5.5गुण);
हृदय शेठ(मुंबई)(5.5गुण)बरोबरी वि.एफएम सोहन फडके(पुणे)(5.5गुण).