नवी दिल्ली: मोबिक्विक, भारतातील अग्रगण्य वित्तीय सेवा मंचने आज विनायक एन यांची मोबिक्विकचे कर्ज व्यवसायाचे प्रमुख म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे. विनायक यांच्याकडे मोबिक्विकसाठी कर्ज व्यवसायाची आश्वासक सुरुवात करण्याची जबाबदारी असेल. लाखो भारतीयांच्या पत आवश्यकता भागवण्यासाठी सुसंगत उत्पादनांची रचना करणे, संबंधित भागीदारी घडवणे, बाजारामध्ये उत्पादनांना योग्य मंच निर्माण करून देणे आणि नफादायक आणि शाश्वत व्यवसायाची खात्री करणे यासारख्या भूमिका त्यांना पार पाडाव्या लागणार आहेत. मोबिक्विक ही अग्रणी बॅंकिंग संस्था आणि एनबीएफसीसह कर्ज उपायांसाठी पोर्टफोलिओची संकल्पना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे.
विनायक यांना प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय आणि भारतीय बॅंकिंग आणि वित्तीय सेवा कंपन्यांमध्ये सुमारे 15 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. मोबिक्विकमध्ये रुजू होण्यापूर्वी विनायक हे फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडमध्ये अलायन्सचे प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि तिथे त्यांनी डिजिटल आणि नॉन-डिजिटल भागीदारींवर काम केले होते. यापूर्वी त्यांनी बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये जोखीम आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ हाताळले आहेत. तसेच कॅपिटल फर्स्ट येथे उद्योग आणि विम्याचे प्रमुख असताना त्यांनी क्रॉस-सेल व्यवसाय सुरू केला होता.
विनायक यांच्या नियुक्ती बद्दल बोलताना, श्रीमती उपासना टाकू, सह-संस्थापक आणि संचालक, मोबिक्विक म्हणाल्या की, “मोबिक्विक कुटुंबामध्ये विनायक यांचे स्वागत करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. चीनमध्ये घडत असल्याप्रमाणे भारतामध्येही डिजिटल वित्तीय सेवा बाजारवर (मार्केट) परिणाम करणार्या ठरू शकतात. या परिणाम करण्यार्यांमध्ये मोबिक्विक अग्रणी राहणार असून समस्त जनतेकडे डिजिटल शक्ती प्रदान करण्याचा अखंड प्रयत्न करीत राहणार आहे. विनायक यांना वित्तीय सेवा उद्योगामध्ये व्यापक अनुभव आहे. मला विश्वास आहे की, डिजिटल कर्ज कौशल्याच्या अनुभवासह त्यांचे व्यवसाय कौशल्य आणि सखोल जोखीम आणि नियंत्रण अभिमुखता मोबिक्विकसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण देशामध्ये सध्या असलेल्या पत तुटवड्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोबिक्विक आपले स्वतःचे डिजिटल कर्ज पोर्टफोलिओ तयार करत आहे.”
“मोबिक्विक हे वैविध्यपूर्ण वित्तीय गरजांसह प्रचंड ग्राहक संख्या असलेल्या डिजिटल वॉलेट उद्योगामध्ये अग्रणी राहिले आहे. इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार्या लाखो युजरना पत उपाय देऊ करण्यासाठी आमच्याकडे सुवर्ण संधी असल्याचे मी मानतो. सर्वच युजरना डिजिटल पद्धतीने त्वरित पत उपाय उपलब्ध करून देण्यासाठी एंड-टू-एंड कर्ज उत्पादन बनविण्याच्या प्रक्रियेत सध्या आम्ही आहोत. आम्ही मोबिक्विकच्या मंचावर सर्वोत्तम फिनटेक लेंडिंग इकोसिस्टीम बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि तसा आम्हाला विश्वासही आहे. आमच्याकडे सर्वोत्तम टीम असून येत्या काळात कर्ज उद्योगामध्ये एक प्रमुख अग्रणी बनण्याचा आमचा मानस आहे,” असा विश्वास श्री. विनायक एन, प्रमुख-कर्ज व्यवसाय, मोबिक्विक यांनी व्यक्त केला.
मोबिक्विकविषयी:
मोबिक्विक हे भारतातील सर्वात मोठा डिजिटल वित्तीय सेवा मंच, एक प्रमुख मोबाईल वॉलेट आणि आघाडीचे पेमेंट गेटवे आहे. मोबिक्विक ॲप हा सुमारे 3 दशलक्ष थेट व्यापारी आणि 107 दशलक्षपेक्षा अधिक युजरचे विस्तृत जाळे असलेले आघाडीचा मोबाईल पेमेंट मंच आहे. बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी सन 2009 मध्ये कंपनीची स्थापना केली असून कंपनीने सेक्वाया कॅपिटल, अमेरिकन एक्स्प्रेस, ट्री लाईन एशिया, मीडियाटेक, जीएमओ पेमेंट गेटवे, सिस्को इन्व्हेस्टमेंट्स नेट1 आणि बजाज फायनान्स यांकडून चार फेरींचा निधी उभारला आहे. कंपनीची नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि कोलकाता येथे कार्यालये आहेत. मोबिक्विक भारतातल्या डिजिटल व्यवहाराचा सर्वात मोठा स्त्रोत बनण्याचे आणि सन 2022 पर्यंत अब्जावधी भारतीयांना डिजिटल पेमेंट, कर्ज, विमा आणि गुंतवणूकीसाठी एकच मंच उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे..
मोबिक्विकला ‘भागीदारीची शक्ती’ या संज्ञेत विश्वास असून सन 2017 मध्ये मोबिक्विकने बीएसएनएल, बजाज फिनसर्व्ह लिमिटेड आणि इंडसइंड बँक यासारख्या आघाडीच्या ब्लू-चिप ब्रँडसह एक लघु भागीदारी सुरू केली आहे. ऑगस्ट 2017 मध्ये मध्ये, बीएसएनएलने बीस्पोक मोबाईल वॉलेट सुरू करून डिजिटल क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले, जे वॉलेट मोबिक्विकद्वारे विकसित आणि पारीत करण्यात आले आहे. मोबिक्विकने बजाज फिनसर्व्हसह भागीदारी करून भारताचे पहिले क्रेडिट वॉलेट, ईएमआय वॉलेट सुरू केले असून यामार्फत ग्राहक क्रेडिट आणि लोन प्राप्त करू शकतात. मोबिक्विकने भारताचे पहिले ऑटो-लोड वॉलेट तयार केले असून ज्याचा लाभ इंडसइंड बँकचे 10 दशलक्षपेक्षा अधिक ग्राहक घेऊ शकतात. तसेच कंपनीने व्हर्च्युअल कार्डसाठी आयडीएफसी बँकसह करारही केला आहे.