75 हून अधिक (95 टक्क्यांहून जास्त) अपार्टमेंट्सची विक्री झाली केवळ एका आठवड्यातच
पुणे- व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (एनएसई स्क्रीप आयडी VASCONEQ, बीएसई स्क्रीप कोड 533156) या अत्यंत विश्वासार्ह व पुण्यात मुख्यालय असलेल्या विकसकाने आज घोषित केले, की तळेगावजवळ काटवी येथे ‘व्हॅस्कॉन गुडलाईफ’ हा नवीन प्रकल्प सुरू झाल्यापासून एका आठवड्यातच तेथील 475 अपार्टमेंटसची विक्री झाली आहे. या विक्री झालेल्या अपार्टमेंट्सची एकूण किंमत 100 कोटी रुपये आहे. व्हॅस्कॉनने नुकताच दर्जेदार, परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात प्रवेश केला असूनकंपनीच्या गुडलाईफ या प्रकल्पातील 500 घरांच्या नावनोंदणीचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार होते. त्यास मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे, आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम यापूर्वी ठरविलेल्या दिवसापेक्षा अगोदरच सुरू करण्याचे कंपनीने ठरविले आहे.
सुमारे 10 एकर जागेतील गुडलाईफ प्रकल्पात वनरुम किचन, 1 बीएचके व 2 बीएचके असे फ्लॅट्स केवळ परवडणाऱ्या दरांतच नव्हे, तर दर्जेदार स्वरुपात ‘व्हॅस्कॉन’ने सादर केले आहेत. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय प्रकल्पाच्या आवारातच उभारून‘व्हॅस्कॉन’ने एक नवीन सुरुवात केली आहे. ‘गुडलाईफ’मध्ये विविध सोयी-सुविधा असून त्यांत सर्व वयोगटांचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येक टॉवरमध्ये अभ्यासासाठी वाचनालय असून त्याखेरीज ग्रंथालय संगणकांची उपलब्धता असलेले विशेष कक्ष बांधण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात सहा व अकरा मजली इमारती उभारून सुमारे 500 घरे सादर करण्यात येणार आहेत.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन यांनी सांगितले, की काटवी येथील ‘व्हॅस्कॉन गुडलाईफ’ ला अगदी पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे ग्राहकांचा आमच्यावर किती मोठा विश्वास आहे, याची आम्हालाप्रचिती आली. प्रकल्प सादरीकरणाला मिळालेल्या या यशामुळे परवडणारी, दर्जेदार घरे बांधण्याच्या आमच्या निर्णयाला पाठबळ मिळाले आहे. यापुढेही आम्ही या स्वरुपाचे आणखी प्रकल्प उभारू.
‘गुडलाईफ’पासून जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि द्रूतगती महामार्गाला अगदी सहज जाता येते. आयटी कंपन्या आणि विविध उद्योग यांच्या जवळच हा प्रकल्प आहे.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. संबंधी ..
‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स’चे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पहिल्या काही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये ‘व्हॅस्कॉन’चा समावेश होतो. गेल्या 30 वर्षांत कंपनीने निवासी, औद्योगिक बांधकामे, आयटी पार्क, मॉल, मल्टीप्लेक्स, हॉस्पिटॅलिटी व समाज विकास केंद्रे असे विविध दोनशेहून अधिक प्रकल्प देशभरातील सुमारे 30 शहरांमध्ये उभे केले आहेत. यातील काही कामे स्वतःची आहेत, तर काही ‘इपीसी’च्या माध्यमातून केलेली आहेत. यापुढे ‘इपीसी’ पध्दतीच्या कामांवर तसेच परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांवर भर देण्याचे ‘व्हॅस्कॉन’ने ठरविले आहे.