पुणे-बालेवाडी स्टेडियम येथे २० ते २४ एप्रिल २०१८ दरम्यान भरवण्यात आलेल्या इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट फेडरेशन्सच्या वर्ल्ड स्कूल्स चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दर्जाचा खेळ पाहाण्यात आला. या कोर्टावर झालेला खेळ या महिन्याच्या सुरुवातीलाच संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०१८ च्या तोडीचा होता.
बेल्जियमच्या खेळाडूंनी कोर्टावर दाखवलेल्या उच्च दर्जाची खिलाडू वृत्तीने त्यांना आयएसएफ वर्ल्ड स्कूल्स चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या यंदाच्या आवृत्तीमध्ये फेयर प्ले चषक मिळवून दिला.
या स्पर्धेमध्ये १५ देशांतील ३०० मुले व मुली आपापल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत सहभागी झाली होती. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या विभागांत एकूण ६९० सामने खेळण्यात आले. ही स्पर्धा एकंदरीतच प्रेक्षणीय ठरली.
सांगता समारंभ श्री. नॉबर्ट केव्हर, क्रीडा संचालक, आयएसएफ, श्री. इंदर चोप्रा, सेक्रेटरी जनरल, फेरेरो इंडिया आणि श्री. गौरव दीक्षित, संचालक, एसजीएफआय यांसारख्या मान्यवरांबरोबरच खेळाडूंमध्येही आनंद आणि सच्च्या खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवणारा ठरला
या प्रसंगी श्री. इंदर चोप्रा, सेक्रेटरी जनरल, फेरेरो इंडिया म्हणाले, ‘जागतिक पातळीवर बेल्जियमने दाखवलेली गुणवत्ता, निश्चयी आणि सच्ची खिलाडू वृत्ती यांबद्दल त्यांना किंडर+स्पोर्ट्स फेयर प्ले चषक प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. आयएसएफप्रमाणेच किंडर+स्पोर्ट्स देखील खेळाद्वारे शिक्षण, निरोगी जीवनशैली आणि लिंग समानता या मूल्यांवर अधिष्ठित आहे.’
श्री. चोप्रा पुढे म्हणाले, ‘क्रीडा क्षेत्रातील तरुण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरुण बॅडमिंटन खेळाडूंना ‘जॉय ऑफ मूव्हिंग’चा आनंद देणे हे किंडर+स्पोर्ट्स सीएसआर उपक्रमाचे ध्येय आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे मान्यवर, सहभागी खेळाडू आणि मदतनीस कर्मचारी वर्ग यांचे आम्ही आभार मानतो.’
श्री. गौरव दीक्षित, संचालक स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने पुणे, भारतात वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशईप बॅडमिंटनचे आयोजन केले. खेलो इंडिया- स्कूल गेम्सचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आम्ही या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले. पहिल्यांदाच भारतात बॅडमिंटन वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले होते. हा एक असामान्य अनुभव आणि यशस्वी कार्यक्रम ठरला.’
किंडर+स्पोर्टबद्दल
किंडर+स्पोर्ट फेरेरोने विकसित केलेला जागतिक उपक्रम असून तरुण पिढीमध्ये शारीरिक सक्रियतेचा प्रचार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम फेरेरोच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.
लहान मुलांना खेळण्यास उद्युक्त करून त्यांच्यात व त्यांच्या कुटुंबात सक्रिय जीवनशैला प्रचार करणे व शारीरिक सक्रियता हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे या या उपक्रमाचा हेतू आहे. जगभरातील मुलांना सक्रिय बनवण्यात आघाडीचे स्थान मिळवणे हे फेरेरो समुहाचे ध्येय आहे.
२००५ मध्ये स्थापन झालेले किंडर+स्पोर्ट सध्या २८ देशांत कार्यरत असून दरवर्षी ४.४ दशलक्ष मुलांना सक्रिय करते.
किंडर+स्पोर्टच्या प्रकल्पामध्ये जगभरात विविध प्रकारच्या ३२०० कार्यक्रमांद्वारे गुणवत्तापूर्ण मुले व मुली सहभागी होतात.
– विविध क्रीडाप्रकार शिस्त, त्यामध्ये व्हॉलीबल, बास्केटबॉल, फुटबॉल, पोहोणे, फेन्सिंग, स्कीइंग, पाण्यातील पोलो, बोट चालवणे, हँडबॉल, डॉजबॉल
– एकूण १४४३ खेळाडू, विजेते आणि माजी कर्णधार आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार करण्यासाठी क्रीडा कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
– चार ऑलिंपिक समिती आणि १२६ क्रीडा फेडरेशन्स व संघटना सहभागी झाल्या आहेत ९२ राष्ट्रीय फेडरेशन्स आणि क्रीडा संस्था
– आयएसएफबरोबर (इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट फेडरेशन) आंतराष्ट्रीय भागिदारी ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळात भाग घेणाऱ्या जगभरातील ४० मिलियन मुलांचा सहभाग,