मुंबई– शॅलेट हॉटेल्स लि. च्या पोर्टफोलिओमधील हॉटेल्स आज निर्माण झालेल्या कठीण काळात आपल्या सर्व प्रॉपर्टीजवरील व्हर्च्युअल हृदय उजळवतएकजूट, चिकाटी आणि शक्तीचा संदेश पसरवण्यासाठी एकत्र आली आहेत. रात्रीच्या वेळेस रिकाम्या रस्त्यावर, शहराच्या नेहमीच्या गजबजाटाऐवजी नीरव शांतता असताना,दूरवरूनही दिसणाऱ्या या हृदयांचे नागरिकांनी कौतुक केले, कारण त्यांना यातून येणाऱ्या चांगल्या दिवसांची आशा दिसली.
या उपक्रमाविषयी शॅलेट हॉटेल्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय सेठी म्हणाले, ‘#लाइट्सऑफलव्ह उजळवून आम्ही या अवघड काळात आशा जागवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे यातून आम्हाला सध्याच्या परिस्थितीतही आव्हानांना तोंड देत जनतेची सेवा करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करायचीआहे. आमच्या हॉटेलमध्येही पाहुण्यांना सेवा देण्यासाठी कामावर हजर असणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांनाही यावेळेस विसरून चालणार नाही. पोलिस तसेच कामावर असलेल्या सर्वांना खाद्यपदार्थ आणि पेये पुरवण्यासाठी आम्ही हॉटेलचे दरवाजे खुले ठेवले असून त्याचबरोबर पॅकबंद अन्नपदार्थ आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणेही आम्ही पुरवत आहोत. या संकटातून आपण एकत्रितपणे बाहेर पडूया.’
शॅलेट हॉटेल्स लिमिटेड
शॅलेट हॉटेल्स लिमिटेड (सीएचएल) ही भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये उच्चभ्रू हॉटेल्सची मालक, डेव्हलपर, मालमत्ता व्यवस्थापक कंपनी आहे. आमच्या हॉटेल प्लॅटफॉर्ममध्ये एका को- लोकेटेड सर्व्हिस्ड रेसिडन्स असलेल्या हॉटेलसह सहाकार्यरत हॉटेल्सचा सममावेश असून ती मुंबई मेट्रोपोलिटन, हैद्राबाद, बेंगळुरू, पुणे या शहरांत वसलेली आहेत. सीएचएल हॉटेल्स हा जगभरात नावाजला गेलेला हॉस्पिटॅलिटी ब्रँड असून हा ब्रँड लक्झरी अप्पर अपस्केल आणि अपस्केल हॉटेल क्षेत्रात कार्यरत आहे. हॉटेल प्लॅटफॉर्मद्वारे मध्यवर्ती ठिकाण, कार्यक्षम डिझाइन आणि विकास, हॉटेल क्षेत्रातील योग्य स्थान ब्रँडिंग, आघाडीच्या हॉस्पिटॅलिटी कंपन्यांबरोबर आवश्यक कार्यकारी करार यांवर भर दिला जातो. सीएचएलद्वारे आतापर्यंतच्या अनुभवाच्या मदतीने हॉटेल मालमत्तांचे प्रभावी व्यवस्थापन केले जाते.