मुंबई, 31 मार्च 2020 –भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या ज्योती लॅब्ज लि. (जेएलएल) कंपनीने कोविड- 19 रिलीफसाठी 5 कोटी रुपयांचे योगदान दिल्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एमपी रामचंद्रन यांनी आज जाहीर केले,केरळ मुख्यमंत्री निधीसाठी दोन कोटी रुपये देण्यात आले असून आसाम मुख्यमंत्री निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री निधी यांच्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
सध्याच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करत श्री. रामचंद्रन म्हणाले, ‘आपण सर्वजण एका अनपेक्षित गंभीर परिस्थितीला तोंड देत आहोत आहोत आणि या क्षणी अडचणीत असलेल्या प्रत्येकाला आपण एकजुटीने मदत करण्याची गरज आहे. आमचे सर्व कर्मचारी तसेच संपूर्ण समाजाप्रती आमची सामाजिक जबाबदारी आहे. या राष्ट्रीय संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत आणि मला आशा वाटते, की आपली तसेच आपल्यासाठी अविरतपणे झटत असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी आपण घ्यायला हवी. समाज या नात्याने आपण सर्वांनी सध्याच्या परिस्थिती आर्थिक तसेच इतर योगदान द्यायला हवे.’
ज्योती लॅब्जबद्दल
श्री. एमपी रामचंद्रन यांनी १९८३ मध्ये ज्योथी लॅबोरेटरीज लि. या ही वेगाने विकसित होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूच्या कंपनीची स्थापना केली होती. इतक्या वर्षांत कंपनीने एका ब्रँडच्या प्रोप्रायटरी कंपनीचे मल्टी ब्रँड, बीएसई आणि एनएसई नोंदणीकृत कंपनीमध्ये रुपांतर केले आहे. या कार्यकाळात कंपनी फॅब्रिक केयर, मस्किटो रिपेलंट, सरफेस क्लिनिंग, वैयक्तिक सेवा आणि सुगंधी अगरबत्ती क्षेत्रातील उत्पादन आणि विपणन क्षेत्रांत कार्यरत आहे.
कंपनीचे दहा ब्रँड कार्यरत असून त्यात उजाला, मॅक्सो, एक्सो, प्रिल, मार्गो, नीम, चेक आणि श्री. व्हाइट यांचा समावेश असून हे सर्व ब्रँड्स त्यांच्या विभागात सुप्रसिद्ध आणि प्रस्थापित आहेत.
कंपनी संघटित लाँड्री क्षेत्रातील सेवा विभागातही कार्यरत असून ती ज्योथी फॅब्रिकेयर सर्व्हिसेस लिमिटेड या आपल्या उपकंपनीद्वारे ‘जागतिक दर्जाची लाँड्री सेवा, परवडणाऱ्या दरांत आणि घरपोच’ उपलब्ध करून देते.