लफेअर या चौथ्या पर्वाचा नुकताच समारोप केलेल्या, गोदरेजच्या वार्षिक लाइफस्टाइल उपक्रमाचे रूपांतर पूर्णतः ग्रीन इव्हेंटमध्ये झाले. या उपक्रमामध्ये, अनेक प्रसिद्ध व्यक्ती, प्रभावशाली व्यक्ती, मीडियातील प्रोफेशनल, कॉर्पोरेट, टेलिव्हिजन व चित्रपटातील सेलिब्रेटी यांसह 1300 हून अधिक जणांनी सहभाग घेतला.
गोदरेज अप्लायन्सेसने यानिमित्ताने ई-वेस्टच्या वाढत्या संकटाकडे सर्वांचे लक्ष वेधले – भारत हा ई-वेस्ट निर्माण करणारा पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे, असे ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर 2017 ने नमूद केले आहे. यासाठी कंपनीने इलेक्ट्रिकल कम्पोनंट व पार्ट्स, केबल, कॉम्प्रेसर्स, चार्जर, सर्किट अशा ई-वेस्ट साहित्यापासून तयार केलेल्या भव्य इन्स्टॉलेशनचे अनावरण केले. ‘द थिंकर’ या प्रसिद्ध पुतळ्याच्या प्रेरणेने व ‘थिंकिंग मॅन’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या निर्मितीचे नाव #दनॉनथिंकिंगह्युमन असे आहे. पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार न करता इलेक्ट्रॉनिक्स व अप्लायन्सेस यांचा बेपर्वाईने वापर करणाऱ्या आणि बेजबाबदारपणे त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या आधुनिक स्त्रिया व पुरुषांचे हे प्रतिक आहे. हे इन्स्टॉलेशन ‘रिड्युस, रीयुज अँड रिसायकल’ (घट, पुनर्वापर व पुनःप्रक्रिया) या विचारांना उत्तेजन देते.
गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदी गोदरेज व गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक तानया दुभाष यांनी ई-वेस्ट जागृती कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे.
गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक तानया दुभाष यांनी स्पष्ट केले, “गोदरेज या ब्रँडच्या डीएनएमध्ये ग्रीन ही संकल्पना सामावलेली आहे. लफेअरची या वेळची आवृत्ती पूर्णपणे शाश्वततेच्या भोवती गुंफलेली होती. लोकांशी जोडले जाण्यासाठी आणि विचारांना चालना देणाऱ्या कल्पना मांडण्यासाठी हा ब्रँड सर्व प्रकारच्या संधींचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतो. गोदरेज अप्लायन्सेसचा असाच एक प्रयत्न म्हणजे, आजच्या तंत्रज्ञान-प्रणित जगामध्ये कोणतीही खरेदी करत असताना आपण जागरुक राहणे गरजेचे आहे, तसेच उत्पादनांचे आयुष्य संपल्यावर त्यांची विल्हेवाट लावताना अधिक दक्षता घेणे व ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ या संकल्पनेचा अवलंब करणे आवश्यक आहे, हे अधोरेखित करण्यासाठी #दनॉनथिंकिंगह्युमन सादर केले आहे.
गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट कमल नंदी यांनी म्हटले, “एक जबाबदार आणि पर्यावरणाच्या बाबतीत जागरुक ब्रँड म्हणून, गोदरेज अप्लायन्सेस काही कालावधीपासून ग्रीन उत्पादने तयार करत आहे व त्यांचा प्रसार करत आहे. या प्रयत्नांचा स्वाभाविक पुढचा टप्पा म्हणून आम्ही ई-वेस्टबद्दल जागृती करत आहोत. या संदर्भात, अप्लायन्सेस व इलेक्ट्रॉनिक्स यांची खरेदी करत असताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी, असे आमचे आवाहन आहे. विशेषतः उत्पादनाची उपयुक्तता संपली की सर्वाधिक काळजी घ्यावी आणि जबाबदारपणे ई-वेस्टची विल्हेवाट लावावी. त्यांच्याकडील जुनी अप्लायन्सेस घेऊन जाण्यासाठी गोदरेजच्या 1800 209 5511 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करावा व वेळ ठरवून घ्यावी, अशी सुविधाही आम्ही त्यांना देत आहोत.”
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनीही या लाइफस्टाइल इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. ‘क्लायमेट वॉरिअर’ टॅगचा सार्थ अभिमान असणाऱ्या भूमी यांनी, गोदरेज अप्लायन्सेसच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून ई-वेस्टविरोधीच्या लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन लोकांना केले आहे. त्यांच्याबरोबर श्वेता नंदा बच्चन, शेफ वरुण इनामदार, लोकप्रिय आरजे हृषी के. असे अनेक सेलिब्रेटीही ग्रीन या संकल्पनेसाठी पुढे आले आहेत.