नवी दिल्ली – स्त्रियांना स्वतंत्र आणि सुरक्षित वाहनचालक बनवण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने सेफरायडरस्मार्टरायडर या आपल्या खास उपक्रमाअंतर्गत देशभरातील स्त्रियांना रस्ता सुरक्षेविषयी प्रशिक्षण देत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला.आयएमजरनेशनइक्विलिटी या यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संकल्पनेशी सुसंगत राहात होंडा टुव्हीलर्स इंडियाने सर्व वय, जात आणि धर्माच्या स्त्रियांना एकत्र आणत त्यांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देत नवे स्वातंत्र्य दिले.
जास्तीत जास्त स्वतंत्र आणि सुरक्षित दुचाकीचालक तयार करण्याच्या हेतूने होंडाने स्त्रियांवर लक्ष केंद्रित करणारा सेफरायडरस्मार्टरायडर हा उपक्रम दुहेरी हेतूसह तयार केला आहे. होंडाच्या 14 ट्रॅफिक प्रशिक्षण पार्क्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 1000 स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. त्याशिवाय होंडाने 8 शहरांतील (यमुनानगर, भोपाळ, अंगुल, जगदलपूर, मदुराई, बेळगाव, पालघर आणि अलीपूरदुआर) शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणआऱ्या 6000 तरुण महिलांसह होंडाने महिला दिन साजरा केला.याप्रसंगी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रभू नागराज म्हणाले, ‘दररोज कित्येक स्त्रिया नोकरीवर रूजू होत आहेत. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्हाला स्त्रियांना वाहन चालवण्याचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर मिळणारे स्वातंत्रय अनुभवण्याची संधी द्यायची आहे. सेफरायडरस्मार्टरायडर हा उपक्रम स्त्रियांना सक्षम आणि स्वतंत्र तसेच सुरक्षित चालक बनवण्याच्या ध्येयासह तयार करण्यात आला आहे. स्त्रीत्व साजरे करणाऱ्या या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.’
प्रमुख कार्यक्रम
स्त्रियांना सेफरायडरस्मार्टरायडर बनवण्यासाठी होंडा टुव्हीलर्स इंडियाने तिहेरी हेतूसह आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला.
1) थिअरी सत्र – सर्व सहभागींना ट्रॅफिकचे नियम, वाहन चालवतानाच्या काही टिप्स, रस्त्यावरील चिन्हे, सुरक्षेच्या उपाययोजना अशा महत्त्वांच्या विषयांचे ज्ञान देण्यात आले. त्यानंतर रस्ते सुरक्षेविषयक प्रश्नमंजुषा घेण्यात आली.
2) प्रदर्शन– थिअरीद्वारे देण्यात आलेले ज्ञान पक्के करण्यासाठी होंडाच्या रस्ते सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी वाहन तपासणी, दुचाकीची किक मारणे, गाडी वर उचलणे – खाली आणणे ही कामे सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने कशी करावीत हे दाखवले.
3) प्रात्यक्षिक – अंतिम टप्प्यात सर्व स्त्रियांनी रस्त्यावरील प्रत्यक्ष परिस्थितीची प्रतिकृती असलेल्या ट्रॅकवर (ट्रॅफिक सिग्नल, स्पीड ब्रेकर्स, ब्लाइंड स्पॉट्स इत्यादी असलेल्या) त्यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या मदतीने दुचाकी चालवली.
हा संपूर्ण अनुभव अविस्मरणीय करण्यासाठी सर्व स्त्रियांना होंडाचे मर्कंडाइज देण्यात आली तसेच त्यांनी आकर्षक बक्षिसेही दिली.
महिला सक्षमीकरणासाठी होंडाचे सीएसआर उपक्रम
सामाजिकदृष्ट्या जबाबदार कॉर्पोरेट या नात्याने होंडा सातत्याने लिंगसमानतेचा पुरस्कार करत असते व त्यांना त्यांचे कुटुंब आणि समाजातील बदलाचे प्रतिनिधी बनवण्यासाठी झटत असते. होंडाने सपनों की उडान (व्यावसायिक वैमानिक बनण्याच्या तरुण स्त्रीच्या स्वप्नाला पंख), उम्मीद (युद्ध आणि सैन्यदलातील विधवांचे आयुष्य उंचावण्यासाठी उपक्रम), उन्नती (तरुण स्त्रियांना व्यावसायिक प्रशिक्षण देत स्थानिक स्त्रियांना सक्षम करणे) अशा उपक्रमांतून आतापर्यंत 11000 स्त्रियांना सक्षम केले आहे. त्याशिवाय होंडाने तरुणांचा कौशल्य विकास करण्यासाठी होंडा सेंटर ऑफ एक्सलन्स, सुरक्षारक्षक बनवण्यासाठी आवशअयक कौशल्य व ज्ञानाचे प्रशिक्षण देणारा वुमन सिक्युरिटी गार्ड ट्रेनिंग उपक्रमही सुरू केला आहे.