नोएडातील शाळेमध्ये आज पहिल्या व्हर्च्युअल क्लासरूमचे आयोजन, जगभर 11,000 हून अधिक विद्यार्थी जीआयआयएस व्हर्च्युअल क्लासरूमचा वापर करण्याची अपेक्षा
नोएडा – नोएडातील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) या आशियातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय शाळेने विद्यार्थ्यांसाठी आजपासून जीआयआयएस व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले आहेत. यानुसार, ऑनलाइन व्हीडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.
बेंगळुरू, पुणे, सूरत व अहमदाबाद येथील जीआयआयएस शाळाही एक-दोन दिवसांत या सुविधेचा अवलंब करणार आहेत आणि यामुळे या शहरांतील, तसेच जगभरात विस्तारलेल्या जीआयआयएस शाळांतील 11,000 हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांचया घरी बसून त्यांच्या सोयीने शिकण्याची सोय उपलब्ध होणार आहे. इतक्या व्यापक प्रमाणावर व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करणारी जीआयआयएस ही पहिलीच शाळा आहे.
जीआयआयएसने भारतात व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केल्याबद्दल बोलताना, सीबीएसई सचिव अनुराग त्रिपाठी यांनी नमूद केले, “भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करून, जीआयआयएस विद्यार्थी वर्गासाठी मोठे काम करत आहे. कॉव्हिड-19 या आव्हानात्मक काळामध्ये शिक्षण देण्याचे काम सातत्यपणे सुरू ठेवत, जीआयआयएस सर्व पालकांना कमालीचा दिलासा देणार आहे. अशाच प्रकारचे नावीन्यपूर्ण पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करावेत आणि त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू देऊ नये, यासाठी आम्ही शक्य तितक्या सीबीएसई शाळांना उत्तेजन देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत.”
ग्लोबल स्कूल्स फौंडेशनचे तंत्रज्ञानाचे सहाय्यक संचालक अर्जुन तेमुर्णिकर म्हणाले: “जीआयआयएसमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ मिळेल, अशा शैक्षणिक पद्धतींचा अवलंब केला आहे. व्हर्च्युअल क्लासरूम हे त्याचेच एक विशेष उदाहरण आहे. व्हर्च्युअल क्लासरूममुळे विचारांची देवाण-घेवाण केली जाते व त्यामुळे नावीन्य साकारण्यासाठी उत्तेजन दिले जाते. तसेच, यामुळे संवाद साधला जातो आणि जीआयआयएसमध्ये कोणतेही व्यत्यय न येता नावीन्यपूर्ण शिक्षण देण्याचा व घेण्याचा अनुभव विद्यार्थी व शिक्षकांना मिळतो.”
कॉव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर आणि जीआयआयएस इंडियातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे येऊ न देण्याची दक्षता घेण्यासाठी शाळेने शिक्षण देण्याचे अनेक नावीन्यपूर्ण पर्याय अवलंबले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना सदैव सुरक्षित राहणे शक्य होणार आहे. जीआयआयएसने व्हायरसचा परिणाम कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये येणारे अडथळे कमी करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी कंटिन्युइटी प्लानची (सीपी) अंमलबजावणी केली आहे.
जीआयआयएस शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाय योजले आहेत. यातील काही उपाय आहेत – सर्व कर्मचारी, विद्यार्थी व शाळेत येणारे व्हिजिटर यांच्या तापमानाची तपासणी, पालकांकडून तापमानाची दैनंदिन तपासणी आणि डब्लूएचओ मार्गदर्शक तत्त्वांनुसार दररोज संपूर्ण शाळेच्या विशेष स्वच्छतेची अंमलबजावणी.
अगोदर, जगभरातील कॉव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर, जपान व सिंगापूर येथील जीआयआयएस शाळांमध्ये जीआयआयएस व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात आले. जपान सरकारने सर्व शाळांना 4 आठवडे शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते, तर सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्यासंबंधी कठोर मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने शाळा सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. यामध्ये, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याला पूर्णतः बंदी घालण्यात आली.
5 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल क्लासरूम अतिशय सहजपणे वापरल्या. मायजीआयआयएस या जीआयआयएस आरअँडडीने मिहान नागपूर येथील एसईझेड प्रकल्पामध्ये विकसित केलेल्या प्रोप्रायटरी एज्युईआरपी सिस्टीममधील सुरक्षित लिंकवर क्लिक करून त्यांना व्हर्च्युअल क्लासरूम उपलब्ध झाले.
विद्यार्थ्यांना पूर्णतः डिजिटल पद्धतीने शिकण्याचा अनुभव देण्यासाठी अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान समाविष्ट करण्यामध्ये जीआयआयएस नेहमीच आघाडीवर आहे आणि कोरोना व्हायसच्या पार्श्वभीमूवर केवळ 3 दिवसांमध्ये हे व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात आले.
जीआयआयएस विद्यार्थी अर्णव वर्षनी म्हणाला, “आज थंडीमुळे मी शाळेत जाऊ शकलो नाही. त्यामुळे मी आणि माझे मित्र जीआयआयएस व्हर्च्युअल क्लासरूममध्ये सहभागी झालो. त्यामध्ये, आम्ही प्रत्यक्ष वर्गामध्ये जसे शिकतो तसाच अनुभव मिळाला. मला व्हाइटबोर्ड अतिशय स्प्ष्टपणे पाहता आला, मला शिक्षक दिसत होते, मी वेळोवेळी त्यांना प्रश्न विचारू शकलो आणि आम्हाला शिकवत असतानाच शिक्षकांना माझ्या शंकांची उत्तरे देणेही शक्य होत होते.”
जीआयआयएस शिक्षक, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शिवालिक के. पठानिया यांनी सांगितले, “पूर्णतः सुसज्ज डिजिटल स्मार्ट बोर्ड डिस्प्ले, व्हीडिओ कॉन्फरन्सिंगचा सुलभ वापर, सुस्पष्ट आवाज ऐकण्यासाठी माइक यामुळे वर्ग अतिशय संवादात्मक असतो. काही कारणाने शाळेत येऊ शकत नसलेल्या विद्यार्थ्यांना या सुविधांमुळे लवचिकता प्राप्त होते. यामुळे शिकवण्यामध्ये सातत्य राहते, तसेच वर्गामध्ये काय शिकवले जात आहे, याची कल्पना सर्व विद्यार्थ्यांना राहते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय शाळेने शैक्षणिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी संपूर्ण शाळेत करण्याच्या बाबतीत आणि हे तंत्रज्ञान शिक्षक व विद्यार्थी या दोन्हींसाठी सोयीचे असण्याच्या बाबतीत जीआयआयएस खरेच अतुलनीय आहे”.
व्हर्च्युअल क्लासरूमचा भाग म्हणून, विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइल फोनवरून किंवा अन्य कोणत्याही पर्सनल डिव्हाइसवरून लॉग इन करण्याची आणि शाळेत सुरू असलेल्या वर्गामध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध होते. लॉग इन केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांबरोबर त्यांची स्क्रीन शेअर करता येते आणि डिजिटल स्मार्टबोर्डवर शेअर केलेल्या संकल्पना पूर्णतः पाहता येतात.
या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यासक्रम पूर्ण करत असताना एकमेकाशी कनेक्टेड राहता येते आणि त्यांच्या वेळेचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते. प्रामुख्याने परीक्षा जवळ आल्या की याचा फायदा अधिक होतो. शिक्षकांच्या दृष्टीने विचार करता, काही विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य नाही झाले तरी व्हर्च्युअल क्लासरूममुळे संपूर्ण वर्गाला एकाच गतीने प्रगती करता येते. एका शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे, “माझा संपूर्ण वर्ग माझे लेक्चर ऐकण्यासाठी उपस्थित आहे, हे पाहून मला आनंद होतो. जास्तीत जास्त विद्यार्थी वर्गामध्ये असतील तर सर्वांना प्रचंड प्रेरणा मिळते.”
याचबरोबर, व्हर्च्युअल क्लासरूममुळे विविध देशांमध्ये व विविध प्रमाण वेळांमध्ये सहयोग साधण्याला उत्तेजन मिळून स्मार्ट शिक्षण दिले जाते. जीआयआयएस विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लासरूम या सुविधेद्वारे अन्य जीआयआयएस संकुलातील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणे, सहयोग करणे, कण्टेण्ट देणे-घेणे व चर्चा करणे शक्य होते.
जगाच्या कोणत्याही ठिकाणी असलेल्या विशिष्ट विषयातल्या तज्ज्ञांची गेस्ट लेक्चर जीआयआयएस विद्यार्थ्यांसाठी भाषण किंवा सेमिनार या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात, यामुळे मोठ्या प्रमाणात ज्ञान दिले-घेतले जाते आणि विचारांचीही देवाण-घेवाण होते.
मोठ्या प्रमाणात संवाद साधणे आणि विचारांची देवाण-घेवाण करणे यामुळे शिक्षणाची परिणामकारकता वाढते आणि शिकण्याचा या अनुभवाचे रूपांतर नावीन्यपूर्ण कल्पनांमध्ये होते. विद्यार्थ्यांच्या कल्पना वर्गापुरत्या मर्यादित राहत नसल्याने त्यांना जगभरातील तज्ज्ञांचे विचार समजून घेता येतात आणि त्यामुळे नावीन्य साधण्याची त्यांची क्षमता वाढते.
आधी कधीही न मिळालेले फायदे या जीआयआयएस व्हर्च्युअल क्लासरूममुळे मिळणार आहेत. सर्व वर्गांतील विद्यार्थी व शिक्षक यांना कोठूनही प्रकल्प चर्चेमध्ये सहभागी होता येणार आहे. शिक्षकांना त्यांच्या स्टाफ रूममध्ये बसून किंवा घरून शिकवणे शक्य आहे. व्हर्च्युअल क्लासरूम सेशन्सचे रेकॉर्डिंग करता येऊ शकते आणि ते भविष्यात संदर्भासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना ते पाहता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेल्या गोष्टींचा अनुभव पुन्हा घेता येऊ शकतो आणि न समजलेल्या गोष्टी पुन्हा समजून घेता येऊ शकतात. या वैशिष्ट्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रचंड फायदा होणार आहे.