महिंद्रा XUV300 ने ओलांडला 13,000 बुकिंगचा टप्पा

Date:

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या 20.7 अब्ज डॉलरच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने, अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या स्टायलिश व थरारक  XUV300 या कॉम्पॅट एसयूव्हीसाठी 13,000 बुकिंग करण्यात आल्याचे आज जाहीर केले.

आज, एसयूव्ही उद्योगामध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे प्रमाण 40% आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये झपाट्याने वाढणारी श्रेणी आहे.

बुकिंगविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सेल्स व मार्केटिंग प्रमुख वीजय राम नाकरा यांनी सांगितले, “XUV300ला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीसारख्या अत्यंत स्पर्धात्मक श्रेणीमध्ये 15 ते 20% हिस्सा मिळवण्याच्या आमच्या उद्दिष्टानुसार, आम्ही पहिल्याच महिन्यात 13,000 हून अधिक बुकिंग मिळवली आहेत व आम्ही आघाडीच्या 3 मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच, ग्राहकांनी XUV300 ला पसंती दर्शवली असल्याचे अधोरेखित केले आहे. 75% हून अधिक बुकिंग हे  XUV300च्या टॉप एंड प्रकारांसाठी झाले आहे, हेही उल्लेखनीय आहे.”

या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रतीक्षेच्या असणाऱ्या XUV300ने, आकर्षक, चित्त्यापासून प्रेरित डिझाइन, थरारक कामगिरी, सुरक्षेची या श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्ये व उत्कृष्ट इंटिरिअर या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांकडून व ऑटो तज्ज्ञांकडून मोठी पसंती मिळवली आहे. XUV300 ला आतापर्यंत 2.5 हून अधिक लीड्स मिळाल्या आहेत.

महिंद्राविषयी

20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकर देयकांची छपाई बँकेमार्फत; महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार

पुणे: पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडील देयके, नोटीस व वॉरंट...

हडपसर गाडीतळ उड्डाणपुल दुरुस्तीस ५३.९६ कोटींचा प्रस्ताव; ‘संरचना’ कंपनीला काम देण्याची शिफारस

पुणे : हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुणे...

महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला मान्यता

पुणे: पुणे महापालिका हद्दीतील फक्त महिलांच्या नावावर असलेल्या ५००...

प्रभाग समितीचे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र व्हावे – सौ. मंजुश्री खर्डेकर.

नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात अध्यक्ष...