पुणे: बँक ऑफ महाराष्ट्रने दिनांक 13 ऑगस्ट 2018 पासून विविध कालावधीतील ठेवींवरील व्याजदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये रिटेल ठेव (किरकोळ ठेव) व्याजदरामधील तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या ठेवींसाठी 50 बेसिस पॉइंटसची वृद्धी करण्यात आली. रिटेल ठेवींवरील नवीन व्याजदर खालीलप्रमाणे;
कालावधी | सदयाचा व्याजदर (%) | नवीन व्याजदर (%) |
07 ते 45 दिवस | 4.25 | 4.25 |
46 ते 90 दिवस | 5.25 | 5.25 |
91 ते 364 दिवस | 6.00 | 6.00 |
365 दिवस | 6.50 | 6.50 |
एक वर्षापेक्षा अधिक ते 2 वर्ष | 6.50 | 6.50 |
दोन वर्षापेक्षा अधिक ते 3 वर्ष | 6.60 | 6.60 |
तीन वर्षापेक्षा | 6.00 | 6.50 |
रुपये 1.00 कोटी ते रुपये 5.00 कोटी अशा मोठ्या प्रमाणातील ठेवीं (बल्क डिपॉझिटस) यावर 75 ते 100 बेसिस पॉइंटसची वृद्धी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणातील ठेवींवरील व्याजदर आता खालीलप्रमाणे;
कालावधी | सदयाचा व्याजदर (%) | नवीन व्याजदर (%) |
07 ते 45 दिवस | 3.50 | 4.25 |
46 ते 90 दिवस | 3.75 | 4.50 |
91 ते 364 दिवस | 4.00 | 4.75 |
365 दिवस | 4.25 | 5.25 |
एक वर्षापेक्षा अधिक ते 2 वर्ष | 4.25 | 5.00 |
दोन वर्षापेक्षा अधिक ते 3 वर्ष | 4.25 | 5.00 |
तीन वर्षापेक्षा | 4.25 | 5.00 |
त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रने दिनांक 7 ऑगस्ट 2018 पासून विविध कालावधीतील कर्जाच्या व्याजदराचा (एमसीएलआर) आढावा घेऊन कर्जाच्या व्याजदरामधेदेखील बदल केले आहेत. हे व्याजदर खालील प्रमाणे;
कालावधी | एमसीएलआर |
ओव्हरनाईट एमसीएलआर | 8.00% |
एक महिना एमसीएलआर | 8.10% |
तीन महीने एमसीएलआर | 8.20% |
सहा महीने एमसीएलआर | 8.40% |
एक वर्ष एमसीएलआर | 8.75% |
बेस व्याजदरामध्ये कोणताही बदल झाला नसून तो पूर्वीप्रमाणेच 9.50% इतका कायम ठेवण्यात आलेला आहे.