मुंबई. अभिनेता सोनू सूद याने रविवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्याच्यासोबत मंत्री अस्लम शेख होते. दरम्यान, या भेटीनंतर साेनू याने माध्यमांशी बोलताना आमच्यात काहीही गैरसमज नसल्याचे सांगितले. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.
सोनू याने लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत केली होती. सेना नेते संजय राऊत यांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांत कलगीतुरा रंगला होता. सेनेकडून या भेटीवर काहीही प्रतिक्रिया आली नाही.