कालच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णसंख्येमध्ये 1 हजार 199 ने वाढ -ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 866

Date:

पुणे विभागातील 5 लाख 90 हजार 625 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 6 लाख 19 हजार 854 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 2 :- पुणे विभागातील 5 लाख 90 हजार 625 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 19 हजार 854 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 866 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.28 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 199 ने वाढ झाली आहे.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 8 हजार 918 रुग्णांपैकी 3 लाख 89 हजार 486 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 271 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.25 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 58 हजार 918 रुग्णांपैकी 55 हजार 791 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 274 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 27 रुग्णांपैकी 50 हजार 347 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 836 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 844 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 514 रुग्णांपैकी 46 हजार 588 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 166 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 760 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 477 रुग्णांपैकी 48 हजार 413 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 319 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 199 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 865, सातारा जिल्ह्यात 195, सोलापूर जिल्ह्यात 77, सांगली जिल्ह्यात 22 तर कोल्हापूर जिल्ह्यात 40 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 115 आहे. पुणे जिल्हयामध्ये 876 , सातारा जिल्हयामध्ये 74, सोलापूर जिल्हयामध्ये 131, सांगली जिल्हयामध्ये 21 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 13 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 40 लाख 78 हजार 973 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 19 हजार 854 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 1 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषद उपसभापती:महाविकास आघाडीच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार, महायुतीचे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड

मुंबई-महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर अखेर शिवसेना (शिंदे गट) नेते...

टॉक्सिक’च्या जगात दमदार महिलांची एन्ट्री; ‘लेडीज अँड लेडीज’ व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई | रॉकिंग स्टार यश अभिनित बहुचर्चित 'टॉक्सिक : अ...

आकांक्षा रंजनच्या ‘इक्का’ची झलक; कोर्टरूम थ्रिलरमध्ये दिसणार नव्या अंदाजात

मुंबई | अभिनेत्री आकांक्षा रंजन आपल्या प्रत्येक नव्या भूमिकेत वेगळेपणा...

‘मसाला किंग’ धनंजय दातार यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याला शाहरुख खान, सोनू निगम यांची उपस्थिती

मुंबई | प्रतिनिधी 'मसाला किंग' म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योगपती धनंजय...