वाढदिवसानिमित्त पार्ट्यांऐवजी अनाथ मुलांना नित्यगरजेच्या वस्तुंचे वाटप व अन्नदान
पुणे- आनंद तरंग चाईल्ड केयर (अनाथ आश्रम) या संस्थेमध्ये टायगर ग्रुपचे युवा सदस्य ऊद्योजक योगेश होळकर यांनी आपला वाढदिवस सोहळा अनाथ मुलांच्या सोबतसाजरा केला .
संस्थेतील मुलांना अन्नदान व नित्य गरजेच्या वस्तुंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अनावश्यक खर्च टाळुन अनाथाश्रमामध्ये केलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याचे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै.तानाजी जाधव व पै.अनिकेत घुले यांनी कौतुक केले.
या अनुपम्य सोहळ्यास आळंदीचे विद्यमान उपनगराध्यक्ष सचिन अण्णा गिलबीले, नगरसेवक पांडुरंग वहीले, नगरसेवक दिनेश घुले, आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनरावजी कु-हाडे यांचे चिरंजीव सतीष कु-हाडे, ऊद्योजक संतोष थोरात, ठाकुर साहेब, स्वप्निल मुरकुटे, सुभाष साळवे, संजय शेलार,नागेशजी नानकिल्ले,पांडुरंग महाराज दाभाडे,आनंद-तरधग चाईल्ड केयर अनाथालयाचे ह.भ.प.अविनाश महाराज पाटील,गणेश महाराज काळे. नितीन काळे आदी मान्यवर ऊपस्थीत होते.