Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जातपंचायतीचे भयानक सत्य आर्त..मध्ये दिसणार – मुक्ता दाभोळकर

Date:

मुंबई – डी.एस.फिल्म्स निर्मित आणि ॠषीराज क्रिएशन कृत, निर्माता दिलीप शहा आणि राजेंद्र जी.साळी लिखित, दिग्दर्शित आर्त  या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच अ.नि.स च्या मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते मुंबईत मोठ्या जल्लोषात पार पडला, यावेळी चित्रपटातील शीतल साळुंके, गणेश यादव, जयराज नायर, संतोष मयेकर, अजित सावंत, अजित भगत इ.कलाकार देखील उपस्थित होते.

यावेळी मुक्ता दाभोळकर यांनी सांगितले की, सर्वप्रथम तर मी आर्त चित्रपटाच्या सर्व टीमचे अभिनंदन करते कारण त्यांनी इतका मोठा आणि गंभीर विषय हाताळला, जातपंचायत फक्त अशिक्षित आणि आदिवासी समाजातच आहे असं नाही, तर सुशिक्षित समाजातही याचे प्रमाण मोठे आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अनेक वर्ष जातपंचायतीच्या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध लढा पुकारल्यानंतर आज महाराष्ट्रात जातपंचायतीवर कायदा करण्यासाठी आंदोलन उभं होत असतांना, आर्त सारख्या चित्रपटातून या विषयाला लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजे मला मोठे धाडस वाटते.

आर्त हा मराठी चित्रपट येत्या २० मे २०१६ रोजी सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, चित्रपट हा जातपंचायत या व्यवस्थेवर कटाक्ष टाकतो, महाराष्ट्रात कसारा, नंदुरबार अशा अनेक ग्रामीण भागांत आणि संपूर्ण देशभरात अनेक राज्यात अशा पीड़ित महिलेंच्या घटना रोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात, परंतु यावर सिनेमा करण्याचे धाडस कुणी  करत नाही, परंतु गल्लाभरु विषयाला बगल देत मी हा विषय खुप सवेंदनशीलपणे चित्रपटात मांडला आहे अशी प्रतिक्रिया लेखक दिग्दर्शक राजेंद्र जी.साळी यांनी व्यक्त केली आहे, ते पुढे सांगतात की, अशा विषयाला स्थापित आणि ज्यांची काही ठराविक इमेज आहे असे कलाकार घेणे मी हेतुपुरस्कर टाळले आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या ह्या धाडसी विषयाला चित्रपट निर्माता म्हणुन दिलीप शहा यांनी विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचा खुप आभारी आहे. लेखक दिग्दर्शक राजेंद्र जी.साळी पुढे सांगतात की, या विषयाची दाहकता फक्त चित्रपटगृहात न राहता संपूर्ण देशभरात व्हावी यासाठी आणि या बाबतचा कायदा लवकर मंजूर व्हावा यासाठी आम्ही लोकसभेच्या सर्व सदस्यांसाठी एक विशेष खेळ आयोजित करणार आहोत.

 

सवांद- मुरलीधर भावसार, राजेंद्र जी.साळी, गीत आणि संगीत – सुरेश घायवट, छायांकन – मनिष पटेल, कार्यकारी निर्माता – विनोद शिंदे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...