पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या काशी यात्रेची यशस्वी सांगता
पुणे- नवरात्रौ महोत्सव समितीने आयोजित केलेल्या काशी यात्रेची यशस्वी सांगता आज (मंगळवारी) झाली. यात्रेचे हे सलग एकविसावे वर्ष होते आणि यंदा त्यात बाराशे यात्रेकरुंचा सहभाग होता.
अतिशय नियोजनबद्ध आखणी केलेली काशी यात्रा मंगळवारी सकाळी परतली त्यावेळी पुणे रेल्वे स्थानकावर यात्रेकरुंच्या नातेवाईकांनी फुलांचा वर्षाव करून यात्रेकरुंचे स्वागत केले. यात्रेचे पुण्य लाभल्याचा अवर्णनीय आनंद ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर होता. यात्रेकरुंच्या स्वागतासाठी पुणे रेल्वे स्थानकावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
काशी यात्रेत श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन, गंगा स्नान, गंगेची आरती, गंगेतून नौका विहार, काशी आणि परिसरामधील विविध मंदिरातील देवतांचे दर्शन घडविण्यात आले, गंगा नदीवरील प्रसिद्ध घाटांनाही यात्रेकरूंनी भेटी दिल्या.त्याच बरोबर त्रिवेणी संगम ईलाहाबाद ,सीतामढी या ठिकाणी भेट दिली .
21 वर्षा मध्ये आज पर्यंत 55000 पेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांनी काशी यात्रेचा लाभ घेतला
काशी यात्रेचे संयोजन पुणे नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष आबा बागुल यांनी केले. तसेच अमित बागुल, नंदू बानगुडे, रमेश भंडारी आदींनी सहाय्य केले. माजी आमदार उल्हास दादा पवार ,माजी महापौर कमलताई व्यवहारे नगरसेवक प्रसन्न जगताप, माजी नगरसेवक जयंत किराड ,माजी नगरसेवक बालाजी तेलकर ,बाळासाहेब कातुरे व इतर मान्यवर यात्रेत सहभागी झाले होते.
यात्रेचे संयोजन अभिषेक बागुल, सागर आरोळे , इम्त्याज तांबोळी ,संतोष पवार, धनंजय कांबळे , बाबासाहेब पोळके, लक्ष्मण कुतवळ, महेश ढवळे, सचिन महंगडे, राजू पोळ , राम रणपिसे , तेजस बागुल ,भरत तेलंग , मिलिंद पगारे आदी कार्यकर्ते या ट्रिप मध्ये सहभागी झाले होते