पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांना स्वरभास्कर पुरस्कार प्रदान
पुणे -महानगरपालिके तर्फे भारतरत्न पं . भीमसेन जोशी यांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून दरवर्षी संगीत क्षेत्रातील जेष्ठ मान्यवर कलाकारांना स्वरभास्कर पुरस्कार देऊन गौरवण्यात येते यंदाचा स्वरभास्कर पुरस्कार पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शॉल , श्रीफळ , सन्मान चिन्ह , मानपत्र , एक लाख रुपये रोख असे आहे. यावेळी अध्यक्ष स्थान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भूषविले प्रमुख पाहुणे मुकारी अलगुडे उपमहापौर , पद्मश्री उल्हास कशाळकर जेष्ठ गायक , उल्हास पवार माजी आमदार ,सौ कशाळकर, स्थानिक नगरसेवक आबा बागुल, आदी उपस्थित होते.
उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी आभार मानले व घनशाम सावंत यांनी सूत्रसंचालन केले.