मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे, भव्य कलादालन साकारण्यात यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रस्तावाचे सादरीकरण

मुंबई, दि. ३० :- मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन व्हावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने प्रकल्प आराखडा आणि त्यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभे करण्याचे नियोजन आहे. त्याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील समिती कक्षात सादरीकरण तसेच आढावा बैठक झाली.

बैठकीस पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, मु्ख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह नाटय व कला क्षेत्रातील आदेश बांदेकर, सुबोध भावे, विजय केंकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेशे असे भव्य कलादालन साकारण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, कलादानाची उभारणी करताना त्यामध्ये नाविन्यपूर्ण अशा बाबींचा समावेश करण्यात यावा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. कलादालनाचा परिपूर्ण प्रकल्प आराखडा तसेच अनुषांगीक प्रस्ताव सादर करण्यात यावा. तसेच संबंधित यंत्रणांनी समन्वयाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवर उभारण्यात येणाऱ्या या कलादानाची इमारत देखील देखणी आणि वास्तू कलेची उत्तम नमूना असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी बैठकीत मराठी रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखविणाऱ्या कला दालनाची इमारत, बाह्य व अंतर्गत रचना यांसह विविध प्रकारच्या सुविधा याबबत सादरीकरण करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मराठी’ विषय टाळणाऱ्या शाळांची मान्यता गोठवणार, लाखाचा दंड ही ठोठावणार:पहिली ते दहावीपर्यंत सर्व माध्यमांच्या शाळांना राज्य सरकारचा इशारा

‘इंग्रजी’ माध्यमाच्या आणि सीबीएसई शाळांना बसणार चाप! मुंबई-राज्यातील सर्व माध्यमांच्या...

विवाहितेचा खून: मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापुर्वीच खुनी वकील, त्याची पत्नी व मुलीला अटक

पुणे-आपल्याच कार्यालयात काम करणाऱ्या विवाहित महिलेशी अनैतिक संबध ठेऊन...

नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा-महापौरांनी ऊर्जामंत्र्यांना घातले साकडे

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका...

मोदी सरकारला पहिला धक्का! महिला आरक्षण विधेयक नामंजूर; लोकसभेत गदारोळ

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी पडले:बाजूने 298, विरोधात...