जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

Date:

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2022

जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचे 08 जुलै 2022 रोजी निधन झाले.दिवंगत मान्यवरांना आदरांजली म्हणून, उद्या संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

दुखवटा असताना, संपूर्ण भारतात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल.आणि त्या दिवशी कोणतेही औपचारिक मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत.

शिंजो आबे हे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील होते. शिंजो आबे यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५४ रोजी जपानची राजधानी टोक्यो येथे झाला. शिंजो आबे हे त्यांच्या कुटुंबातील राजकारणात सक्रिय असणारे तिसऱ्या पिढीचे नेते होते. त्यांचे वडील शिंतारा आबे यांच्या व्यतिरिक्त त्यांचे आजोबा कोन आबे हे देखील जपानचे ज्येष्ठ राजकारणी होते. आबे यांचे पंजोबा म्हणजेच त्यांच्या आजोबांचे वडील योशिमा ओशिमा हे इम्पीरियल जपान आर्मीमध्ये जनरल म्हणून तैनात होते. शिंजो आबे यांची आई योको किशी १९५७ ते १९६९ या काळात पंतप्रधान असलेल्या नोबू किशी यांची मुलगी आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी सर्वाधिक काळ हे पद भूषवले आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भारत आणि जपानमधील संबंध अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले. भारत आणि जपानमध्ये यापूर्वीही चांगली मैत्री होती, मात्र शिंजो आबे यांनी त्यांच्या कार्यकाळात या मैत्रीत भर घातली. यामुळेच गेल्या वर्षी भारताने त्यांना देशाच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मविभूषणने सन्मानित केले होते. जपानने भारतात अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले आहेत. देशातील मेट्रो प्रकल्पात जपाननेही मोठे योगदान दिले आहे.

शिंजो आबे हे जपानची राष्ट्रीय सुरक्षा, तांत्रिक विकास आणि इतर देशांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ओळखले जातात. शिंजो आबे यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरही उत्तम काम केले. यामुळेच त्यांना एकापाठोपाठ एक सलग सहा निवडणुका जिंकता आल्या. आपल्या परराष्ट्र धोरणाच्या जोरावर शिंजो आबे यांनी शेजारील देशांशी समतोल संबंध राखले, त्यानंतर चीन आणि अमेरिकेसारख्या महासत्तांशी जपानचे संबंध सुधारण्याचा पवित्रा घेतला.

शिंजो आबे हे भारतासाठी अतिशय खास नेते होते. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या बाजूने उभे राहणे असो किंवा संकटकाळात भारताला मदत करणे असो, शिंजो आबे यांच्या नेतृत्वाखाली जपानने नेहमीच भारताला साथ दिली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भागीदारीसह शिंजो आबे यांनी भारत-जपान संबंधांना नव्या उंचीवर नेले. शिंजो आबे यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात भारताला भेट दिल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा दिली.

शिंजो आबे हे २०१४ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आलेले जपानचे पहिले पंतप्रधान होते. यावरून त्यांचे भारताशी असलेले सखोल नाते दिसून येते. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना भारतासोबत चांगले संबंध हवे होते. भारतातील यूपीए सरकार असो किंवा एनडीएचे असो, जपानशी भारताचे संबंध वाढतच गेले, याचे कारण हेच होते.

नरेंद्र मोडी यांची भारताचे पंतप्रधान होण्याच्या आधीपासून आणि शिंजो आबे यांची मैत्री होती. २००७ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शिंजो आबेंना पहिल्यांदा भेटले. यानंतर हे दोन्ही नेते २०१२ मध्ये भेटले होते. २६ जानेवारी २०१४ रोजी जेव्हा शिंजो आबे प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून आले होते. परंतु प्रोटोकॉलनुसार ते पंतप्रधान मोदींना भेटू शकले नाहीत, तेव्हा पंतप्रधान मोदी शिंजो आबे यांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांच्या मैत्रीची खूप चर्चा झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन विचारपूस केली होती. त्याच वेळी, या दोन्ही नेत्यांनी नेहमीच हे सुनिश्चित केले की दोन्ही नेत्यांचे जगाबद्दलचे मत सारखेच राहील जेणेकरून दोन्ही मित्र देशांच्या विकासात कोणताही अडथळा येऊ नये. शिंजो आबे यांच्या कार्यकाळातच जपानने भारताला अणुशक्ती असलेला देश म्हणून स्वीकारले. भारत आणि जपान यांच्यात २०१६ मध्ये नागरी अणु करार झाला होता.शिंजो आबे हे दीर्घकाळ जपानचे पंतप्रधान होते. शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे २०२० मध्ये जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी जड अंत:करणाने राजीनामा दिल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. शिंजो आबे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिंजो आबे यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली होती. पद सोडण्यापूर्वी शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.सप्टेंबर २०१७ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी अहमदाबादमध्ये देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी केली होती. भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्राची राजधानी आणि गुजरातमधील अहमदाबाद दरम्यान तयार होत आहे. हा प्रकल्प जपानच्या सहकार्याने बनवला जात आहे. या प्रकल्पासाठी भारत आणि जपानमध्ये करार झाला आहे. त्याचप्रमाणे भारतात मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात जपाननेही महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर भारतानेच मेट्रोचा विस्तार करून नवीन मेट्रो रेल्वे मार्ग बांधले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...