माजी सैनिकांच्या जागेबाबत गैरव्यवहार -महापालिका भूमी अभिलेखाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Date:

पुणे : माजी सैनिकांच्या जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना भूमि अभिलेखा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी करुन दिली तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी त्यावर मंत्रा २९ गोल्ड कास्ट या प्रकल्पाचा प्लॅन पास करुन दिल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी बांधकाम व्यवसायिकासह महापालिका अधिकारी व भूमि अभिलेखा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय.

या प्रकरणी माजी सैनिक राजेंद्रसिंग यांचे कुलमुख्यत्यारधारक विशाल सत्यवान खंडागळे (वय ३५, रा. रामवाडी, नगर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन रोहीत घनश्याम गुप्ता (वय ६०), मुकेश घनश्याम गुप्ता (वय ५५), किशोर पोपटलाल गाडा (वय ४५), निलेश पोपटलाल गाडा (वय ४०, सर्व रा. मेट्रोपोल, बंडगार्डन रोड) तसेच पुणे महानगर पालिका व भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट २००९ ते ४ मे २०२१ दरम्यान घडला आहे. खंडागळे यांनी खडकी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करुन त्याच्या चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी गन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलमुखत्यारधारक खंडागळे यांची धानोरी येथील मुंजाबा वस्तीमधील वहिवाटीची सर्व्हे नं २९ मधील एकूण क्षेत्र १५ हजार १०० स्क्वेअर मीटर पैकी प्लॉट नं. १६, २० आणि २१ क्षेत्र, ९ आर (गुंठे) या जागेची मंत्रा २९ गोल्ड कोस्ट डेव्हलपर्स एलएलपी चे भागीदार गुप्ता व इतरांनी येरवडा येथील भुमी अभिलेख कार्यालयात खोटी माहिती देऊन सर्व्हे नं. २९ ची मोजणी करुन घेतली.

या मिळकतीवर सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही पुणे महानगर पालिका व भुमी अभिलेख अधीक्षक कार्यालय, हवेली येथील अधिकार्याशी संगनमत करुन मंत्रा २९ गोल्ड कोस्ट हा प्रकल्प मंजूर करुन घेतला. फिर्यादी यांची सर्व्हे नं. २९ मधील १५ हजार ९०० स्क्वेअर मीटरपैकी प्लॉट नं. १६, २० आणि २१ क्षेत्र ९ आर (गुंठे) धानोरी येथील जागा त्यांची आहे, असे भासवून ती बळकावून फसवणूक केली असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहेत

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...

पथक गेले की पुन्हा अतिक्रमण ! रविवार पेठेतील अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार : महापौर मंजुषा नागपुरे

कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार; बाजारपेठ अतिक्रमणमुक्त...

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; पाठिंबा देणारे खासदार इतिहासात ‘गद्दार’ ठरतील : संजय राऊत

लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप; विधेयकाच्या समर्थनासाठी...

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा म्हणजे मोदी सरकारला मदत करणारी भूमिका : सचिन सावंत

इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर...