महापालिकेबरोबरच स्व खर्चाने बनवले फिरते विसर्जन हौद.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीहि गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत असतानाच नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्यावे, ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. अशा नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एका फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात येणार असून नगरसेवक महेश वाबळे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षी सुद्धा विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद तयार करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत असतानाच नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्यावे. असे आवाहन नगरसेवक वाबळे यांनी केले आहे. मात्र ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. त्या नागरिकांसाठी नगरसेवक महेश वाबळे व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने यावर्षी सुद्धा क्रांती सुर्य महात्मा फुले (तीन हत्ती ) चौक, पद्मावती, नवजीवन सोसायटी येथील संत रोहिदास उद्यान तसेच शिंदे हायस्कूल चौक याठिकाणी विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णाजी इंदलकर यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक वाबळे यांनी केले आहे. यावेळी प्रशांत दिवेकर , बिपिन पोतनीस, कैलास मोरे ,सारिका ताई ठाकर , सुधीर रानडे,अमित सहानी , शांताराम सोनवणे इत्यादी उपस्थित होते.