पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 77 हजार 87

Date:

पुणे विभागातील 3 लाख 2 हजार 758 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 3 लाख 90 हजार 75 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.23 :- पुणे विभागातील 3 लाख 2 हजार 758 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 90 हजार 75 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 77 हजार 87 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 230 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.62 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 57 हजार 797 रुग्णांपैकी 2 लाख 10 हजार 551 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 487 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 759 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.67 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 514 रुग्णांपैकी 21 हजार 625 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 949 आहे. कोरोनाबाधित एकूण 940 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 719 रुग्णांपैकी 20 हजार 760 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 894 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 719 रुग्णांपैकी 20 हजार 588 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 970 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 326 रुग्णांपैकी 29 हजार 234 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 787 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 305 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 440 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 291, सातारा जिल्ह्यात 690, सोलापूर जिल्ह्यात 410, सांगली जिल्ह्यात 697 तर कोल्हापूर जिल्ह्यात 352 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 17 लाख 19 हजार 808 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 90 हजार 75 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 22 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
00000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा धडाका; एकाच दिवसात १ लाख ८८ हजार ७५० चौरस फूट क्षेत्र मोकळे!

वाघोली–केसनंद रस्त्यावर सर्वाधिक ९५ हजार चौरस फुटांवरील कारवाई; बाणेर–बालेवाडीत...

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १९ परदेशी महिला आढळल्या; हद्दपारीची प्रक्रिया सुरू!

कोरेगाव पार्क, मांजरी आणि मुंढवा परिसरात पुणे पोलिसांच्या विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

ग्रामीण भागातील शेतकरी, तरुणांना उद्योजकतेची संधी पुणे, दि.२२: ग्रामीण भागातील...

प्रसिद्ध कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांना दूरदर्शनचा सर्वोच्च ‘टॉप ग्रेड’ दर्जा!

प्रसार भारतीच्या केंद्रीय नृत्य निवड प्रक्रियेत कथक नृत्यासाठी निवड;...