टाटा पॉवरच्या “धागा” ने पुरवले १,२०,००० पेक्षा जास्त मास्क्स;

Date:

पुणे-: आजाराच्या साथीने भारतातील अनेक लोकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे.  लॉकडाउनच्या काळात देशभरात संरक्षक मास्क्सचा तुटवडा भासत आहे.  टाटा पॉवरच्या प्रकल्पांच्या ठिकाणी असलेल्या लोकांची संरक्षक मास्क्सची मागणी पूर्ण करण्यासाठी “धागा” उपक्रमाच्या महिला सदस्यांनी कापडापासून घरगुती मास्क्स तयार केले आहे.  भारतातील विविध राज्यातील, आजाराचा धोका ज्याठिकाणी संभवतो अशा भागांमधील तसेच स्थलांतरित लोकांना हे मास्क्स वापरता येतील.  महाराष्ट्र व झारखंडमध्ये “धागा”च्या महिलांनी १,२०,००० पेक्षा जास्त जास्त मास्क्स पुरवले आहेत.

 पुण्यातील मुळशी, मावळ, ट्रॉम्बे, जमशेदपूर आणि कलिंगनगर येथील “धागा” महिला सदस्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या भागातील लोकांना तसेच स्थलांतरित कामगार, कर्मचाऱ्यांना फेसमस्क्सचे वाटप केले.  त्यानंतर अमेझॉनने देखील कापडी मास्क्सच्या पुरवठ्यासाठी या उद्यमशील महिलांशी संपर्क साधला.

 “धागा” सदस्यांच्या या उपक्रमाबद्दल अभिमान व्यक्त करताना टाटा पॉवरच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सस्टेनेबिलिटी चीफ श्रीमती शालिनी सिंग यांनी सांगितले, “आजाराची साथ पसरण्याचा धोका वाढत असताना महाराष्ट्र, झारखंड आणि ओडिशा मधील स्थानिक जनतेला आणि सुरक्षिततेसाठी आपापल्या घरी परतत असलेल्या स्थलांतरित लोकांना संरक्षक मास्क्सचा तुटवडा भासत असताना अगदी नेमक्या वेळी आमच्या धागा सदस्यांनी हे फेस मास्क्स पुरवले ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.  त्यांनी प्रयत्न आणि मेहनतीने समाजाची मदत केली याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.  आमची इच्छा आहे की ‘धागा‘ च्या या कुशल महिला उद्यमींनी सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपले हे योगदान असेच देत राहावे.”    

 हे मास्क्स सरकारी निर्देश आणि नियमांचे पूर्णपणे पालन करून तयार करण्यात आले आहे.  टाटा पॉवरच्या सीएसआर उपक्रमांतर्गत कंपनीच्या हेल्थ थ्रस्ट एरियाला त्यामुळे मदत झाली आहे.  देशातील दहा राज्यांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी टाटा पॉवरचे कामकाज चालते अशा परिसरांमध्ये स्थानिक जिल्हा प्रशासन, हितधारक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने टाटा पॉवर अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे व मदत करत आहे.

 आज “धागा” उपक्रमामध्ये देशातील ८ राज्यांमधील (दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात) १०५० महिला सहभागी आहेत.  हितधारकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या महिला सातत्याने उत्पादने पुरवत  असतात. केवळ दीड वर्षात या महिलांच्या मासिक उत्पन्नामध्ये २००० ते ५००० रुपयांची वाढ झाली आहे.  त्यांच्या उत्पादन कार्यक्षमतेमध्ये सुधारणा घडून आली असून उपक्रमाची शाश्वतता अधिक मजबूत बनली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुरलीधर मोहोळ आणि विखे पाटील यांच्या निष्प्रभ कारभारामुळे पुण्यावर पाणीसंकट

नियोजन न करता साडेचार महिने कालव्यातून पाणी सोडल्याने पुण्यावर...

कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या जवानांसोबत भाऊबीज साजरी

खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात सैनिकांसोबत भाऊबीज :...

पुणेकरांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या जागेचा पाठपुरावा…

📍नवी दिल्ली पुणे शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी खडकवासला येथे...