पूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी

Date:

‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन‘ स्पर्धा उत्साहात
मुंबई : राज्य पोलीस दलाच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन‘ मध्ये पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने तर महिलांमध्ये ज्योती गवते यांनी पहिला क्रमांक मिळविला.
वांद्रे-वरळी सी-लिंक येथे पहाटे 5.40 वाजता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झेंडा दाखविल्यानंतर मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करून ‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया‘चा संदेश कृतीतून दिल्याबद्दल गृहमंत्र्यांनी राज्य पोलीस दलाचे कौतुक केले. यावेळी क्रीडामंत्री सुनिल केदार, प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला. यावेळी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, बृहृमुंबईचे सह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, प्रसिद्ध अभिनेते अक्षयकुमार, रोहित शेट्टी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन उत्साहात पार पडली. ४२ किलोमीटरची पूर्ण (फूल) मॅरेथॉन, 21 कि.मी.ची अर्ध (हाफ) मॅरेथॉन, 10 मैल म्हणजेच 16 कि.मी. दौड आणि 5 किलोमीटरची टाईम रन अशा चार गटांमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. फूल मॅरेथॉन गेट वे ऑफ इंडिया पासून सुरू होऊन राजीव गांधी सागरी सेतू आणि परत गेट वे ऑफ इंडिया येथे समाप्त झाली. हाफ मॅरेथॉन ही राजीव गांधी सागरी सेतू येथून सुरू होऊन गेट वे ऑफ इंडिया येथे समाप्त झाली. 10 मैलांची दौड राजीव गांधी सागरी सेतू ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत तर टाईम रन गेट वे ऑफ इंडिया ते एन.सी.पी.ए. पर्यंत होती.
फूल मॅरेथॉनमध्ये 700 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. हाफ मॅरेथॉनमध्ये सव्वातीन हजारहून अधिक स्पर्धेक, 16 कि.मी. दौडमध्ये सुमारे साडेपाच हजार तर 5 कि.मी. च्या टाईम रनमध्ये सुमारे आठ हजार स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे देण्यात आली.
42 कि.मी.ची फूल मॅरेथॉन पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने पहिला तर पुण्याच्या नवीन हुड्डा याने दुसरा क्रमांक पटकाविला. महिला गटामध्ये प्रथम क्रमांक ज्योती गवते, दुसरा क्रमांक शाल्मली सिंग तर तिसरा क्रमांक रितू पाल यांनी पटकाविला.
21 कि.मी.ची हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात अभिषेक पाल याने पहिला, रणजीत कुमार याने दुसरा, तर तीर्थ कुमार याने तिसरा क्रमांक पटकाविला. महिला गटात कविता यादव यांनी पहिला, किरण सहदेव यांनी दुसरा तर आरती पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया‘ या चळवळीद्वारे पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी अखिल भारतीय पोलीस महासंचालकांच्या परिषदेमध्ये ठराव करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रात या आंतरराष्ट्रीय दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडचे नियोजन विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी केले.

मॅरेथॉनच्या मार्गावर महाराष्ट्र पोलीसांद्वारे ‘सजग आणि समर्थ‘ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना 2 हजार फिजीओथेरेपिस्ट, 300 होमिओपॅथी व आहारतज्ज्ञांचा मोफत सल्ला व उपचार उपलब्ध करण्यात आले होते. मॅरेथॉनच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी नागरिक रस्त्याच्या बाजुला उभे राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘द चेम्बर्स आणि सीएस न्यायविधी एडीआर फोरम’ मधून सामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ व्हावी :पद्मभूषण ॲड. उज्ज्वल निकम

गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन व न्यायालयातील कार्यवाही करीता विशेष सहकार्यपुणे...

शेतकऱ्यांना धमकावून कर्जवसुली केली तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा!

नांदेडमधील शेतकऱ्याच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या...

दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजारांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात पैसे जमा करण्याचे निर्देश

मंत्रिमंडळ बैठकीत अग्रीम मदतीला मंजुरी; सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात फौजदारी कारवाईचा...