“देशाची एकात्मता टिकविण्यात केरळचे  योगदान मोठे” : राज्यपाल 

Date:

मुंबई-तेराशे वर्षांपूर्वी केरळच्या कालडी येथे जन्मलेल्या आद्य शंकराचार्यांनी आपल्या उण्यापुऱ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात देशभ्रमण करून कांचीपुरम, द्वारका, पुरी वबद्रीनाथ येथे मठ स्थापन करून देशाला एकत्र केले. भारतातील लोकांमध्ये भाषा, लिपी, धर्म,पेहराव आदी अनेक भेद असले तरीही आपला देश संस्कृतीच्या धाग्याने घट्ट विणला गेला आहे. हे कार्यशंकराचार्यांमुळे  शक्य झाले. त्यामुळे केरळचे भारताच्या एकात्मतेमध्ये मोठे योगदान असल्याचे उदगार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे काढले.

मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या काही मल्याळी लोकांनी सन १९३० साली स्थापन केलेल्या बॉंबे केरळीय समाज या संस्थेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त संस्थेतर्फे वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘नवती समारोहाचे’ उदघाटन शनिवारी (दि. ८) राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत हिंदू कॉलनी दादर येथील बी.एन.वैद्य सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते.

मल्याळी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या बॉंबे केरळीय समाज संस्थेचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मातृभाषेच्या शिक्षणाचे महत्वअधोरेखित केले. मातृभाषेत शिक्षण देणारे देश खरी प्रगती करतात असे त्यांनी सांगितले.

बॉंबे केरळीय समाज ही केरळबाहेरची सर्वात जुनी मल्याळी संस्था असून सन १९५८ साली माटुंगा येथे संस्थेच्या ‘केरळ भवनम’चे उदघाटन तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांनी केले होते. सन१९६२ साली मुंबई महानगर पालिकेने समाजाला शिवाजी पार्क येथे स्पोर्ट्स पॅव्हिलियनसाठी जागा दिली. संस्था आज विविध ठिकाणी आयुर्वेद उपचार, पंचकर्म चिकित्सा, वाचनालय, ‘विशालकेरळम’ मासिक, मल्याळी भाषा वर्ग, भरत नाट्यम, मोहिनीअट्टम, कथक नृत्य वर्ग तसेच संगीत वर्ग चालवित आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश कुमारमधुसुदनन यांनी दिली.

बॉंबे केरळ समाजच्या नव्वदी निमित्त केरळचे लोकजीवन व संस्कृती तसेच मुंबईचे जनजीवन दर्शविणाऱ्या गाण्याचे उदघाटन करण्यात आले.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सुभाष चंद्रन, सचिवप्रेम राजन नाम्बियार, ‘नवती समारोह’ समितीचे अध्यक्ष डॉ पी.जे. अप्रेन, आयकर विभागातील सह आयुक्त ज्योतीस मोहन आदी उपस्थित होते. यावेळी एका संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पालघरमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार,भोंदू नराधमांना कायद्याचा धाक उरला नाही – रोहित पवार

मुंबई-पालघर जिल्ह्यातील एका भोंदूबाबाने औषध देण्याच्या बहाण्याने एका 13...

PMRDA च्या कारवाईने अनधिकृत होर्डिंगधारकांचे धाबे दणाणले! पुण्यात मात्र राजकारणाने उखळ पांढरे

हवेली, भोरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा! दोन दिवसांच्या मोहिमेत...

आता तरी गावांना न्याय द्या -आपले पुणे आपला परिसर

पुणे-पी एम आर डी ए च्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी...