महिंद्रा लाइफस्पेसेस ने ‘सेन्ट्रलिस’ ची यशस्वी सुरुवात -पहिल्या तीन दिवसात ३०० पेक्षा जास्त घरांची विक्री

Date:

पुणे: २०.७ बिलियन युएस डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहातील महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड (“महिंद्रा लाइफस्पेसेस”) या स्थावर मालमत्ता व पायाभूत सोयीसुविधा विकास उद्योगातील कंपनीने भारतातील आपले प्रमुख कार्यक्षेत्र म्हणून पुण्यावर लक्ष केंद्रित करण्याची परंपरा कायम राखली आहे.  या कंपनीच्या ‘सेन्ट्रलिस‘ या मध्यम श्रेणीतील आवास प्रकल्पाला शुभारंभाच्या टप्प्यातच लक्षणीय प्रतिसाद मिळाला आहे.  राहण्याच्या दृष्टीने लोकांच्या पसंतीच्या पिंपरी शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या प्रकल्पाचा एकूण विस्तार ४.५ एकर असून यामध्ये चार टॉवर्समध्ये ४०० पेक्षा जास्त वन बीएचके व टुबीएचके घरे आहेत.  ‘सेन्ट्रलिस‘मधील घरांचा कार्पेट एरिया ३७.५ चौरस मीटर (४१६.८९ चौरस फीट) ते ५३.४४ चौरस मीटर (५९३.८५ चौरस फीट) आहे व त्यांच्या किमती ४०.५६ लाख रुपयांपासून पुढे आहेत.  हा प्रकल्प महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (“महारेरा”) अंतर्गत नोंदणीकृत आहे. 

 महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्रीमती संगीता प्रसाद यांनी सांगितले, “सेन्ट्रलिस च्या शुभारंभालाच मिळालेला प्रचंड प्रतिसाद आम्हाला आनंद व प्रोत्साहन देणारा आहे.  पुणेकरांनी नेहमीच महिंद्रा लाइफस्पेसेसवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी पूर्ण करण्यावर पूर्ण भर देत देशभरातील रिअल इस्टेट बाजारपेठांमध्ये व्यवसाय वृद्धी करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून पुणे शहरात आमचे स्थान बळकट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”   

 सेन्ट्रलिस हा महिंद्रा लाइफस्पेसेसचा पुण्यातील पाचवा निवासी प्रकल्प आहे.  शैक्षणिक संस्था, हॉटेल्स व रेस्टॉरंट्स, मॉल्स, सिनेमा थिएटर्स या सर्व सोयीसुविधा या प्रकल्पापासून अगदी जवळ आहेत.  आपले सर्व निवासी प्रकल्प सामाजिक पायाभूत सोयीसुविधांनी परिपूर्ण असावेत हा कंपनीचा दृष्टिकोन असतो. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पीसीएमसी लिंक रोड, उत्तम बस सेवा, पिंपरी व चिंचवड रेल्वे स्थानके व पुणे विमानतळ यांच्याशी हा प्रकल्प अगदी सोयीस्कररीत्या जोडला गेलेला आहे.  प्रस्तावित पिंपरी मेट्रो स्टेशन हे या प्रकल्पापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे.

 आधुनिक ग्राहकांच्या गरजा  लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने सेन्ट्रलिसमधील सोयीसुविधा डिझाईन करण्यात आल्या आहेत.  यामध्ये पोहोण्याचा तलाव, लहान मुलांसाठी पोहोण्याचा विशेष तलाव,जिम, वेगवेगळे खेळ खेळता येतील असे मैदान, टेनिस कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, क्लबहाउस, लहान मुलांसाठी खेळण्याची स्वतंत्र जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास प्लाझा यांचा समावेश आहे. 

 भारतात पर्यावरणाला अनुकूल, शाश्वत शहरीकरणाला प्रोत्साहन देणारी, आपले सर्वांचे आरोग्य व कल्याण यांचे हित जपणारी हरित घरे विकसित केली जावीत हा महिंद्रा लाइफस्पेसेसचा मुख्य उद्देश आहे.  भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा प्रत्येक घराला मिळावी यासाठी सेन्ट्रलिसची रचना एल आकारात करण्यात आली आहे.  ऊर्जा बचत करणाऱ्या भिंती व छत, कृत्रिम लायटिंग डिझाईन, सौर उर्जेवर पाणी तापविण्याची सुविधा उपलब्ध करवून देऊन सुविधांचा खर्च कमी केला आहे. त्याचप्रमाणे घरातील हवा शुद्ध राहावी यासाठी लो-व्हीओसी रंग, बागा सुशोभित करण्यासाठी कचरा प्रक्रिया, पावसाचे पाणी साठवण्याची सुविधा, प्रत्येक स्तरावर कचरा वर्गीकरण या इतर सुविधाही याठिकाणी आहेत.  सेन्ट्रलिसला ग्रीन रेटिंग फॉर इंटीग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट यांचे फोर स्टार प्रमाणपत्र मिळाले असून याठिकाणी ग्राहकांना तुलनेने कमी देखभाल खर्चाचे लाभ मिळतील.  

 महिंद्रा लाइफस्पेसेस  पुण्यामध्ये २००७ पासून कार्यरत आहे.  आजतागायत त्यांनी २.८७ मिलियन चौरस फीट जागेचा विकास केला आहे.  त्यांच्या आधीच्या प्रकल्पांमध्ये पिंपरी-चिंचवड येथे ‘महिंद्रा रॉयल‘,वाकडमध्ये ‘द वुड्स‘ सोपानबाग येथे ‘ला आर्टिस्ट‘ यांचा समावेश असून ते पूर्णपणे विकले गेले आहेत. पिंपरी येथील त्यांचा अजून एक प्रकल्प ‘अँथेईआ‘ लवकरच पूर्ण होईल, याठिकाणी १००० घरांचा ताबा देऊन झाला आहे.

 महिंद्रा लाइफस्पेसेस  डेव्हलपर्स लिमिटेड

महिंद्रा लाइफस्पेसेस  डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी १९९४ साली सुरु करण्यात आली.  २०.७ बिलियन युएस डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या महिंद्रा ग्रुपची ही रिअल इस्टेट व पायाभूत सोयीसुविधा विकास कंपनी भारतात पर्यावरणानुकूल शाश्वत शहरीकरणाची पुरस्कर्ती आहे.  ‘महिंद्रा लाइफस्पेसेस‘ व‘हॅपीएस्ट ब्रॅण्ड्स‘ अंतर्गत निवासी प्रकल्प उभारून व ‘महिंद्रा वर्ल्ड सिटी‘ व ‘ओरिजिन्स बाय महिंद्रा वर्ल्ड सिटी‘ या ब्रॅण्ड्समार्फत एकात्मिक शहरे व औद्योगिक केंद्रांचा विकास करून भारतातील शहरांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे.  

 ग्राहकांच्या गरजा, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, विश्वास व पारदर्शिता या परंपरेवर आधारित नाविन्यपूर्ण सुविधा महिंद्रा लाइफस्पेसेस निर्माण करते.  या कंपनीने २४.५ मिलियन चौरस फूट (२.३ मिलियन चौरस मीटर) जागेचा विकास पूर्ण केला असून भारतातील सात शहरांमध्ये अजून निवासी प्रकल्प उभारले जात आहेत.  चार ठिकाणी  ५००० एकरांपेक्षा जास्त जागेवर एकात्मिक विकासकामे / औद्योगिक केंद्र अशा ठिकाणी काही प्रकल्प सुरु आहेत तर काही भविष्यात हाती घेतले जातील.

 भारतातील हरित घरे चळवळीची पुरस्कर्ती असलेल्या महिंद्रा लाइफस्पेसेसला ‘२०१७ जीआरईएसबी रिअल इस्टेट ईएसजी (एन्व्हायरन्मेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स) असेसमेंट‘ मध्ये आशिया खंडात चौथे स्थान मिळाले आहे.  ग्रेट प्लेसेस टू वर्क इन्स्टिटयूटने भारतातील ग्रेट मिड-साईज वर्कप्लेसेस – २०१८ च्या यादीत या कंपनीला २२वे स्थान दिले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या १९१ पोलीस वीरांना पुण्यात मानवंदना; पोलीस स्मृतिदिनी शोक कवायत

पाषाण येथील पोलीस हुतात्मा स्मारकावर पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर...

विजयादशमी निमित्त पराक्रमी सेनाधिकारी सन्मान सोहळा

सैनिक मित्र परिवार, पुणे च्या वतीने आयोजन ; निवृत्त...

नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

पुण्यात ‘आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६’ चे उद्घाटन               पुणे, दि....