आरोग्य चांगले राहण्यासाठी ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन

Date:

पुणे-” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. गिरीश सरडे व लोकमान्य उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी.  के. यादव  यांच्याहस्ते करण्यात आले . पर्वतीमधील निर्मल बाग हॉलमध्ये झालेल्या  ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळ्यास योगाचार्य सतीश अरगडे , आंतरराष्ट्रीय योगाचार्य शिवाजी घोडके ,  ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे , डॉ. मृणाल आशय जमदाडे , लोकमान्य नर्सिंग होमच्या संचालिका डॉ.सुरेखा यादव,   समाजसेविका मेघना ससाणे , टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. मनोजा जोशी , अजित जमदाडे , सुनिता जमदाडे , सुप्रिया ताम्हाणे , शितल कचरे  आदी मान्यवर उपस्थित होते .

आजच्या धकाधकीच्या काळात महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी  ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर घर व्यवस्थित राहील . महिलांनी आपल्या दैनदिन जीवनातून आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे . त्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना  योगासने व प्राणायाम करता येतील . या पुस्तकात सर्व आसनांची माहिती सचित्र माहितीसह प्रकाशित केली आहेत . त्यामुळे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे . अशी माहिती  ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे यांनी दिली .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक कमल मारुती ननावरे यांनी केले तर सूत्रसंचालन मंगल बोरावके यांनी केले तर आभार  डॉ. मृणाल आशय जमदाडे यांनी मानले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार-श्रीनाथ भिमाले

पुणे, ता. २९ : पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी...

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत करणार

पुणे, ता. २९ : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी...

दिवाळीतील गुरुवारची पाणी कपात रद्द

सणासुदीत पुणेकरांना दिलासा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,...