देआसरा आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने नव्या योजनांची सुरूवात.

Date:

ओडिशा कौशल्य विकास प्राधिकरणाशी सुद्धा देआसराने केला सहयोग.

पुणे-देआसरा फाऊंडेशन, नव उद्योजकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने, देआसराने संपूर्ण देशभरात उद्योगाला चालना देण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि ओडिशा कौशल्य विकास प्राधिकरण (ओएसडीए) बरोबर सहयोग केला आहे. तांत्रिक शिक्षणाच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्यांवर आधारीत प्रशिक्षणासाठी योग्य पायाभूत सुविधा विकसित करणे आणि अधिक महत्त्वाचे, उद्योजकता मध्ये विकास यावर भर दिला जाणारा आहे.

ओएसडीए प्रामुख्याने ओडिशामधील कौशल्याच्या विकासाशी निगडीत आहे, ज्या मध्ये प्रामुख्यानी तरुणांना उद्योगाच्या कौशल्याचे प्रशिक्षित दिले जाते. ओएसडीए उद्योगीक शिक्षण आणि प्रशिक्षण देईल,या सहयोगातून देआसरा सुद्धा ओडिशा मधील तरुणांना नवउद्योग उभा करण्यात मदत करणार आहे.तसेच देआसरा  युवकांना व्यावसायिक योजना तयार करण्याची क्षमता प्रदान करेल जे पूर्णपणे कार्यात्मक आणि समजून घेणे सोपे असेल.

असेच टाटा ट्रस्ट हि उद्योजकता वाढविण्यासाठी आणि बेरोजगार युवकांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करत असते.यात देआसरा फाऊंडेशनने टाटा ट्रस्टच्या मदतीने एक व्यवहार्य व्यवसाय योजना विकसित करणे, निधीची सुविधा पुरविणे आणि एक फायदेशीर व्यवसाय चालवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

या वेळी देआसरा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.प्रज्ञा गोडबोले म्हणाले,” या दोन स्थापन केलेल्या संस्थांच्या सहकार्यात्मक दृष्टीकोनामुळे आपण सर्व एकत्रितपणे जास्त तरुण वर्गाला मदत करू शकू जे योग्य दिशेने मार्गक्रमान करतील ज्यामुळे उद्योगजगतात विकास,स्वयंरोजगार आणि रोजगार संधी युवकांना उपलब्ध होईल “

देआसरा, टाटा ट्रस्ट आणि ओएसडीए एकत्रितपणे बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करू शकतात आणि युवकांना आपल्या भविष्याला मदत करण्याच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

_१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात _२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १०...

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे!

शेतकऱ्यांवर नगररचना योजना लादणार नाही; PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत...

पुणे अग्निशमन दलाच्या ९ जवानांची उल्लेखनीय कामगिरी; सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वी!

सहा जवान विशेष प्रावीण्यासह, तर तीन जवान विशिष्ट प्रावीण्यासह...

निकृष्ट रस्ते कामांसाठी आता कंत्राटदारांसह महापालिका अधिकारीही जबाबदार; आयुक्तांचे कठोर निर्देश!

पुणे ग्रँड टूर २०२७ साठी रस्ते विकासकामांना गती; बाणेर–गणेशखिंड...