अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून ससून सर्वोपचार रुग्णालयात बालरोग रुग्णालयात अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणा व्हेंटिलेटर मशीन भेट

Date:

ससून सर्वोपचार रुग्णालयात बालरोग रुग्णालयात अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणा व्हेंटिलेटर मशीन आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून भेट देण्यात आले . सुमारे बारा लाख रुपयांचे हे व्हेंटिलेटर मशीन आहे .

ससून सर्वोपचार रुग्णालया हे संदर्भीय रुग्णालय असल्यामुळे  व्हेंटिलेटर मशीनची नितांत आवश्यकता होती सध्या स्वाइन फ्ल्यू , न्यूमोनिया , डेंग्यू रुग्णाची संख्या वाढल्यामुळे या यंत्राची आवश्यकता होती .त्यामुळे  आमदार अंनतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीमधून हे व्हेंटिलेटर मशीन बसविण्यात आले .

यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले , वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे , बालरोग विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर , डॉ. शिल्पा नाईक , डॉ. राजेश कुलकर्णी , डॉ. छाया वळवी , डॉ. उदय राजपूत,  डॉ. रिमा नागपाल , डॉ. हरीश टाटिया , डॉ . इब्राहिम अन्सारी , डॉ. उषा निकुंभ , डॉ. नितेश अग्रवाल, डॉ. सोमनाथ सलगर  आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , शिक्षण व  आरोग्य यावर आपण  आपल्या आमदार निधीमधून जास्तीत जास्त खर्च करण्यावर भर असतो . त्यासाठी आपण ग्रामीण भागातील तसेच शहरी भागामधील शैक्षणिक संस्थांना संगणक भेट दिले आहेत . ससून रुग्णालयामध्ये यापुढील काळात देखील आपण आपल्या आमदार निधीमधून मदत करणार आहे .ससून रुग्णालयासाठी सुसज्ज्य अशी रुग्णवाहिका देण्याचा आपला प्रयन्त राहील असे आश्वासन त्यांनी दिले .

यावेळी  ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी ससून रुग्णायाबाबत माहिती दिली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे आयोजित आरोग्य शिबीरात ३५० महिलांची तपासणी

नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; श्री महालक्ष्मी...

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे सावट! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची...

पुण्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा! पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; तापमान ३४ अंशांवर

पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन दिवसही तापमान ३३ ते...

‘निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार आम्हीच’:मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा; निवडणुकांसाठी प्रचाराला वेग

सोलापूर-राज्यातील विधानपरिषदेच्या 5 मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार...