धरण उशाला, कोरड घशाला! १५ वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा; सुशिक्षित तरुणांवर मजुरी आणि भाजीपाला विकण्याची वेळ – सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर CJP चा घणाघात!

Date:

‘क्या बोलती पब्लिक’मधून CJP थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; प्रधान बोरीतील सिंचन, रस्ते आणि बेरोजगारीचे विदारक वास्तव उघड!

यवतमाळ : कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) ‘क्या बोलती पब्लिक’ या जनसंवाद उपक्रमांतर्गत पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यासह आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे आणि क्षितिज पगार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील प्रधान बोरी गावाला भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ आणि बेरोजगार तरुणांशी थेट संवाद साधला. या भेटीत सिंचन, रस्ते, शिक्षण आणि बेरोजगारीचे गंभीर प्रश्न समोर आले.

धरण जवळ, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही!

गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या; मात्र कालव्याची निर्मिती न झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. पाण्याअभावी कापसाचे पीक करपून जात आहे. धरणासाठी जमिनी देऊनही शेतात पाणी मिळत नसेल, तर या प्रकल्पाचा फायदा नेमका कोणाला? असा सवाल CJP ने उपस्थित केला.

१५ वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा; ५० तरुण बेरोजगार!

गावाला जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या १५ वर्षांपासून दुरवस्था कायम आहे. खराब रस्ते आणि बससेवेचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील सुमारे ५० सुशिक्षित तरुण बेरोजगार असून, पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणावरही उदरनिर्वाहासाठी गवंडी काम करण्याची वेळ आली आहे.

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असूनही नोकरी नाही!

धरणासाठी जमीन संपादित झालेल्या एका तरुणाला २०१९ मध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळाले. यवतमाळ वनरक्षक भरतीच्या प्रतीक्षा यादीत असूनही त्याला अद्याप नोकरी मिळालेली नाही. रोजगाराअभावी या उच्चशिक्षित तरुणाला यवतमाळहून भाजीपाला आणून आसपासच्या गावांत विकावा लागतो. यातून दिवसाला केवळ २०० ते ३०० रुपये मिळतात. प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या कुटुंबातील तरुणांनाच रोजगारासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? असा सवाल CJP ने उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी प्रधान बोरीच्या प्रश्नांना उत्तर द्यावे – अभिजीत दिपके

CJP अध्यक्ष अभिजीत दिपके म्हणाले, “राज्यातील सत्ताधारी आमदार-खासदार फोडण्यात आणि खुर्ची टिकवण्यात व्यस्त आहेत. मात्र, शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांकडे पाहायला सरकारला वेळ नाही. धरणे बांधली जातात, शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात; पण त्यांच्याच शेतात पाणी पोहोचत नाही. शिक्षण घेऊनही तरुणांना मजुरी आणि भाजीपाला विकण्याची वेळ येत असेल, तर सरकारच्या रोजगारनिर्मितीच्या दाव्यांचे काय? मुख्यमंत्र्यांनी प्रधान बोरीतील शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे.”

‘क्या बोलती पब्लिक’च्या माध्यमातून CJP सामान्य नागरिकांचे प्रश्न थेट सरकारसमोर मांडत आहे. प्रधान बोरीतील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी, गावाला दर्जेदार रस्ता, विद्यार्थ्यांना नियमित बससेवा आणि बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी नीलक्षी वानखेडे आणि प्रकाश भिसे यांच्यासह CJP चे इतर कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने दुष्काळग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘देश संविधानाने चालेल, मनमानीने नाही!’ नागपुरात CJP ची संविधान बचाव रॅली; अभिजीत दिपके यांचा केंद्र सरकारवर घणाघात

संविधान दिनी चार हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग असल्याचा आयोजकांचा...

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरणासह विविध कामांवर निर्बंध

पुणे, दि. २७: राज्यातील सर्व वाहनांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार...

पुणे पोलिसांना थेट सवाल..! गुन्हेगारांना रोखणार कोण? न्यायालयाच्या दारातही नागरिक सुरक्षित नाहीत का?

पुणेकरांना आश्वासन नको, सुरक्षिततेची खात्री हवी; पुणे बार असोसिएशनचे...

आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सव ;लोकाग्रहास्तव बालेवाडी- हाय स्ट्रीट येथे नव्याने सुरु !

पुणे-व्हिएतनाम, मेक्सिको, इथिओपिया ,नेपाळ आणि भारत या ५ देशांमधील...