पुणे पोलिसांना थेट सवाल..! गुन्हेगारांना रोखणार कोण? न्यायालयाच्या दारातही नागरिक सुरक्षित नाहीत का?

Date:

पुणेकरांना आश्वासन नको, सुरक्षिततेची खात्री हवी; पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद पवार यांचे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न

पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा मंदार किवळे याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुन्हा घडल्यानंतर आरोपींना पकडणे महत्त्वाचे आहेच; मात्र गुन्हा घडण्यापूर्वी गुन्हेगारांना रोखणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी नाही का, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या व्यक्तीवर भरदिवसा घातक शस्त्रांनी हल्ला केला जातो. शहरात पोलिसांची गस्त, सीसीटीव्ही आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यरत असतानाही असा गंभीर गुन्हा घडतो, ही बाब चिंताजनक असल्याचे ॲड. पवार यांनी म्हटले आहे.

कात्रज ते शिवाजीनगर; वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास काहीच आले नाही का?

हल्लेखोर कात्रज येथून दोन दुचाकींवर ट्रिपल सीट प्रवास करून शिवाजीनगरपर्यंत पोहोचल्याचे नमूद करत ॲड. पवार यांनी पोलिसांच्या प्रतिबंधात्मक यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

शहरातील अनेक चौक, सिग्नल आणि पोलिस ठाण्यांच्या हद्दी असूनही या दुचाकींना कोणीच अडवले नाही का? वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे पोलिसांच्या निदर्शनास आले नाहीत का? शहरातील सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे कमी पडली, असे सवाल त्यांनी केले आहेत.

पुणे पोलिसांना ॲड. मिलिंद पवार यांचे थेट सवाल…

  • वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी का अडवले नाही?
  • शहरातील पोलिस गस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा कितपत प्रभावी आहे?
  • गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही?
  • न्यायालयाच्या दारातच नागरिक सुरक्षित नसतील, तर सामान्य पुणेकरांच्या सुरक्षेची हमी कोण देणार?
  • गुन्हा घडण्यापूर्वी तो रोखणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी नाही का?

केवळ आरोपींना पकडणे पुरेसे आहे का?

ही केवळ एका प्राणघातक हल्ल्याची घटना नाही, तर पुणे शहरातील पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी असणे आवश्यक आहे, अशी भूमिका ॲड. पवार यांनी मांडली आहे.

पुणेकरांना आश्वासन नको, सुरक्षिततेची खात्री हवी!

गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हे घडू नयेत, यासाठी पोलिस यंत्रणेने सक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. पुणेकरांना केवळ आश्वासने नकोत, तर सुरक्षिततेची खात्री आणि या गंभीर प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, असे ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ॲड. पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पुणे पोलिस प्रशासन काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘देश संविधानाने चालेल, मनमानीने नाही!’ नागपुरात CJP ची संविधान बचाव रॅली; अभिजीत दिपके यांचा केंद्र सरकारवर घणाघात

संविधान दिनी चार हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग असल्याचा आयोजकांचा...

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरणासह विविध कामांवर निर्बंध

पुणे, दि. २७: राज्यातील सर्व वाहनांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार...

आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सव ;लोकाग्रहास्तव बालेवाडी- हाय स्ट्रीट येथे नव्याने सुरु !

पुणे-व्हिएतनाम, मेक्सिको, इथिओपिया ,नेपाळ आणि भारत या ५ देशांमधील...