पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीचे रॅकेट उघड; मांजरीत चौघांना अटक, सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

Date:

अंमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई; दीड लाखांहून अधिक किमतीचे मेफेड्रॉन जप्त

पुणे : शहरातील अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. मांजरी परिसरात अंमली पदार्थविरोधी पथक क्रमांक १ ने कारवाई करून मेफेड्रॉन (एमडी) विक्रीप्रकरणी चार तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थ, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण २ लाख ९८ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) पहाटे सव्वाचारच्या सुमारास मांजरी येथील जी मॉलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिस अंमलदार किरण जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सुरुवातीला तीन संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अंमली पदार्थ पुरविणाऱ्या आणखी एका संशयिताचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी येरवडा परिसरातून त्यालाही ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे :

  • जयेश सतीश कांबळे (वय २१, रा. धुलेनगर, मांजरी बुद्रुक)
  • गणेश शरद शिंदे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा)
  • शोएब हसन शेख (वय २०, रा. आंबेडकर चौक, येरवडा)
  • रोहन राजेंद्र थोरात (वय २१, रा. आंबेडकर चौक, येरवडा)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :

  • ५२ ग्रॅम ६९ मिलिग्रॅम मेफेड्रॉन – १,५८,०७० रुपये
  • चार मोबाईल हँडसेट – १,१०,००० रुपये
  • ॲक्टिव्हा दुचाकी – ३०,००० रुपये

एकूण मुद्देमाल : २,९८,०७० रुपये.

याप्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश निकम करीत आहेत.

‘ड्रग्ज फ्री पुणे’साठी पोलिसांची मोहीम

पुणे शहरातून अंमली पदार्थांच्या व्यापाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडून अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थविरोधी पथक क्रमांक १ ने केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्तर्फे राज्यस्तरीय संगीत व नृत्य करंडक; दि. ४ आणि ५ डिसेंबर रोजी आयोजन

पुणे : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, संगीत आणि नृत्य...

पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना  मानवंदना

 सारसबागेत चित्रकलेतून ३ हजार १५० चिमुकल्यांनी वाहिली आदरांजलीपुणे :...

एका घटनेवरून संपूर्ण पोलिस दलाला दोष देणे योग्य नाही; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची स्पष्टोक्ती!

मंदार किवळे हल्ल्याप्रकरणी नऊपैकी आठ संशयित पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे...

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा चौफेर धडाका; सव्वादोन लाख चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा!

लोहगाव, औंध-बाणेर, पर्वती-सहकारनगर आणि पाषाण-सूस परिसरात मोठी कारवाई; रस्ते...