पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा चौफेर धडाका; सव्वादोन लाख चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा!

Date:

लोहगाव, औंध-बाणेर, पर्वती-सहकारनगर आणि पाषाण-सूस परिसरात मोठी कारवाई; रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याची मोहीम सुरूच

पुणे : अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या धडक मोहिमेचा जोर गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) कायम होता. महापालिकेच्या बांधकाम विभागाने विविध परिमंडळांमध्ये एकूण २ लाख २२ हजार ८६० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली. त्याचबरोबर विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फतही सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

बांधकाम विभागाची परिमंडळनिहाय कारवाई :

  • परिमंडळ क्रमांक १ : स्वतंत्र कारवाई नाही. आदल्या दिवशीची प्रलंबित कारवाई पूर्ण करण्यासाठी कर्मचारी परिमंडळ क्रमांक ४ मध्ये तैनात करण्यात आले.
  • परिमंडळ क्रमांक २ : कोंढवा खुर्द येथील परगेनगर ते वेलकम हॉल चौक परिसरात २१,०५० चौरस फूट.
  • परिमंडळ क्रमांक ३ : बावधन परिसरात ५,९१० चौरस फूट.
  • परिमंडळ क्रमांक ४ : फॉरेस्ट पार्क ते लोहगाव स्मशानभूमी परिसरात ७२,२०० चौरस फूट, तर सावंत पेट्रोल पंप ते ५०९ चौक परिसरात १०,२०० चौरस फूट; एकूण ८२,४०० चौरस फूट.
  • परिमंडळ क्रमांक ५ : पर्वती-सहकारनगर परिसरात ७०,००० चौरस फूट.
  • परिमंडळ क्रमांक ६ : पाषाण-सूस रस्ता, बालाजी चौक, डॉल्फिन चौक आणि शिवशक्ती चौक परिसरात ४३,५०० चौरस फूट.

बांधकाम विभागाची एकूण कारवाई : २,२२,८६० चौरस फूट.

क्षेत्रीय कार्यालयांकडूनही अतिक्रमणांवर हातोडा

  • औंध-बाणेर : ८७,००० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणांवर कारवाई.
  • नगररोड-वाघोली : प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये बांधकाम विभागाच्या समन्वयाने संयुक्त कारवाई; ९,५०० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविली.
  • बिबवेवाडी : कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाला दिवसभर सहकार्य करून १,००० चौरस फूट क्षेत्रावर कारवाई.
  • कोंढवा-उंड्री : नियमित अतिक्रमण निष्कासन कारवाई.
  • वारजे-कर्वेनगर : नियमित अतिक्रमण निष्कासन कारवाई.

अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी प्रशासनाची मोहीम सुरूच

शहरातील अनधिकृत बांधकामांसह सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात महापालिकेच्या विविध विभागांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. सार्वजनिक जागा नागरिकांच्या वापरासाठी मोकळ्या आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीचे रॅकेट उघड; मांजरीत चौघांना अटक, सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

अंमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई; दीड लाखांहून अधिक किमतीचे...

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्तर्फे राज्यस्तरीय संगीत व नृत्य करंडक; दि. ४ आणि ५ डिसेंबर रोजी आयोजन

पुणे : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, संगीत आणि नृत्य...

पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना  मानवंदना

 सारसबागेत चित्रकलेतून ३ हजार १५० चिमुकल्यांनी वाहिली आदरांजलीपुणे :...

एका घटनेवरून संपूर्ण पोलिस दलाला दोष देणे योग्य नाही; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची स्पष्टोक्ती!

मंदार किवळे हल्ल्याप्रकरणी नऊपैकी आठ संशयित पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे...