…तर  शेतीचे श्राद्ध घालावे लागेल :राजू शेट्टी

Date:

ओतूर येथे राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशनाचा समारोप

ओतूर :

महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक शाळेचा वारसा लाभलेल्या ओतूर येथे सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान,ओतूर यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशनाचा रविवार,दि.२२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी माजी न्या.बी.जी.कोळसे-पाटील,शेतकरी नेते राजू शेट्टी  यांच्या उपस्थितीत झाला.सत्यशोधक नगरी,मार्केट यार्ड,ओतूर येथे झालेल्या या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘शेतकरी प्रश्न आणि महाराष्ट्र धर्म’ या दोन महत्त्वाच्या विषयांवर सखोल मंथन झाले.या अधिवेशनासाठी विदर्भ,मराठवाडा,खानदेशातून दोन्ही दिवस दोन हजार सत्यशोधक उपस्थित होते.फुले विचारांचा वारसा,शेतकऱ्यांच्या वर्तमान प्रश्नांची जाणीव आणि महाराष्ट्र धर्मावरील मुक्त चिंतन यांचा संगम साधत या अधिवेशनाचा समारोप झाला.आमदार शरद सोनावणे,डॉ.विशाल तांबे,राजाभाऊ अवसाक,जालिंदर उकिरडे ,संतोष तांबे,भाऊसाहेब चासकर,रवींद्र पोखरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समारोप प्रसंगी बोलताना शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले,’महात्मा फुले शेतकऱ्यांना आपले वाटत होते.दारिद्र्य हे आपले भोग आहेत,असे शेतकऱ्यांना वाटत असे.अशा शेतकऱ्यांना ‘शेतकऱ्यांचा आसूड’लिहून त्यांनी दिशा दाखवली.शेती ३ वर्षे पडीक ठेवली आणि  शासनाने जप्त केली तर कोकणातील सगळी शेती जप्त करावी लागेल.याही शेतीवर अदानी-अंबानींचे डोळे आहेत का ? पडीक शेतीच्या जप्तीबाबत महसूलमंत्र्यांचे विधान उथळपणाचे आहे.तुकडे पडलेल्या शेतीत काहीच परवडत नाही,हे महात्मा फुले यांनी सांगितले होते.भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारझाला तर तो शेतीचे श्राद्ध घालणारा दिवस असेल.अदानी,अंबानी फार रोजगार निर्माण करतील असे वाटत नाही,ते केवळ जमिनी घेत सुटले आहेत.आम्हाला आमचे वाटणारे लोक त्यांच्यात कधी जाऊन बसले,हेच कळले नाही.म्हणून कृषी निविष्ठा निर्मिती आणि प्रक्रिया,विपणन  उद्योगात शेतकऱ्याची मुले का आली नाहीत,याचा विचार केला पाहिजे.हे सर्व महात्मा फुले यांनी सांगितले आहे.दीडशे कोटी देऊन एकेक खासदार विकत घेण्याची ताकद शक्तीपीठ प्रकल्पातून मधून निर्माण होईल,मात्र शेतकरी देशोधडीला लागेल.’जलयुक्त शिवार’ योजना यशस्वी झाली असती तर यावर्षी ऑक्टोबर मध्ये पाण्याची पातळी खाली गेली नसती,असेही त्यांनी सांगितले.संकट शेती आणि शेतकऱ्यांच्या दारात आलेले आहे,आता गाफील राहून चालणार नाही.लोकसभेच्या जागांचे डी-लिमिटेशन झाले तर शहरी जागा वाढतील,शेतकऱ्यांचा आवाज क्षीण होईल.अशा परिस्थितीत महात्मा फुले विचारांचे जागरण सप्ताह व्हायला पाहिजेत.शेतीतच राहू,प्रगती करू,पळ काढून चालणार नाही.’

माजी न्या.बी.जी.कोळसे-पाटील म्हणाले,’ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही हे देशाचे दोन धोके आहेत,हे शेकडो वर्षांपूर्वी समाजसुधारकांनी ओळखले होते.त्याविरुद्ध महात्मा फुले यांनी अविरत संघर्ष केला.फुले विचाराचा हा लढा आपल्याला पुढे न्यावा लागणार आहे.   

दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी साडेनऊ ते साडेअकरा  वाजता ‘किर्तावनी: वारी आडवाटंच्या विठोबाची’ या कार्यक्रमाने झाली.संत नामदेव ते साने गुरुजी यांच्यापर्यंत अभंगातून प्रबोधनात्मक विचार या कार्यक्रमातून मांडण्यात आले.लेखन व दिग्दर्शन ऋचिका खोत यांचे होते,तर संशोधन सहाय्य स्वामीराज भिसे यांचे होते.सकाळी साडे अकरा ते बारा  वाजता ‘ओतूर अभियोग, खटला’ ही लघु नाटिका सादर झाली.निवेदन व संयोजन सुभाष वारे यांनी केले.दुपारी बारा ते १ वाजता सत्यशोधकांच्या विद्यमान वंशजांचा विशेष सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ लोकसाहित्यिक मा.रा.लामखडे आणि निर्मलकुमार देशमुख यांच्या हस्ते हा सत्कार झाला.निवेदन व संयोजन के.ई.हरदास यांनी केले.दुपारी  ‘फुले आणि वर्तमानातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद झाला.या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ शेतकरी नेते राजू शेट्टी होते. प्रमुख वक्ते म्हणून अविनाश पाटील,अरविंद खैरनार,विद्यार्थी संघटक विवेकानंद पाटील,कोल्हापूर हे उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.शिवाजीराव एंडाईत यांनी मानले.सायंकाळी  सत्यशोधक समारोप सत्र झाले.या सत्राचा विषय ‘महाराष्ट्रधर्म: मुक्त चिंतन’ हा होता.अध्यक्ष संजय आवटे,संपादक लोकमत,पुणे हे होते.प्रमुख वक्ते म्हणून मा.रा.लामखडे उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार राजाभाऊ आवसक यांनी मानले. समारोप सत्र माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झाले.आभार प्रा.दत्ता जाधव यांनी मानले.

सायंकाळी ७ ते ९ वाजता ‘खेळ मांडियला’ हे संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील महानाटक सादर झाले.लेखक डॉ.सोमनाथ मुटकुळे हे होते,तर सादरकर्ते शांती फाउंडेशन,संगमनेर हे होते.

‘शेतकरी प्रश्न आणि महाराष्ट्र धर्म’ विषयावर वैचारिक जागर 

‘फुले आणि वर्तमानातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ परिसंवादात राजू शेट्टी,अविनाश पाटील,अरविंद खैरनार,विद्यार्थी संघटक विवेकानंद पाटील यांनी विचार व्यक्त केले.अरविंद खैरनार म्हणाले,’जात ही कीड अजूनही डोक्यातून जात नाही.जात विरहित समाज घडवला पाहिजे. घरातील सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने केले पाहिजे. शेतकऱ्यांना लुबाडण्याचे गावगाड्यातील कार्यक्रम थांबले पाहिजेत.महात्मा फुले यांच्या स्वप्नातील बळीराज्य आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.अविनाश पाटील म्हणाले,महात्मा फुले,डॉ.आंबेडकर यांच्याबाबत अभिजन मनात असलेले पूर्वग्रह काढले पाहिजेत.फुले यांनी दिलेला चिकित्सेचा दृष्टिकोन पुढे नेला पाहिजे.केवळ सोशल मिडियावरील चमकोगिरी पुरणार नाही.विवेकानंद पाटील म्हणाले व्यवस्थारुपी वामन हा बळी राजाला गाडायला पाहत आहे.शेतकऱ्याने शहाणे होण्याची गरज आहे’.राजाभाऊ अवसक यांनी सूत्रसंचालन केले.

‘महाराष्ट्रधर्म: मुक्त चिंतन’ या परिसंवादात अध्यक्ष संजय आवटे,संपादक लोकमत, पुणे हे अध्यक्षस्थानी होते.प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मा.रा.लामखडे म्हणाले,’महाराष्ट्र धर्म जपताना व्यवस्था बदलाच्या प्रक्रियेवर लक्ष द्यायला हवे.संजय आवटे म्हणाले,’महात्मा फुले यांचा लढा कोणत्याही जातीविरुद्ध नव्हता.त्यांना कमालीचे वैश्विक भान होते.महिला शिकल्याशिवाय क्रांती होणार नाही,याची त्यांना कल्पना होती.छ.शिवाजी महाराज,फुले-आंबेडकर हे सर्वांचे आहेत,हे लक्षात घेतले पाहिजे.संतांचे बोट सोडून महाराष्ट्राला पुढे जाता येणार नाही.हे बोट सोडल्याने महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.यापुढे प्रबोधनाचा ‘ओतूर पॅटर्न’ पुढे नेला पाहिजे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रद्धा, आणि भक्तीचा भावस्पर्शी प्रवास ‘श्याम शरणम्’

२०२७ मध्ये हिंदी आणि गुजराती भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित! काही...

तुळशीबाग राममंदिरात गाभाऱ्यात जाऊन पुणेकरांनी घेतले  दर्शन

वैकुंठ चतुर्दशी ; श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे आयोजन पुणे :...

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील भरतीमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करा!

मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव पुराव्याशिवाय जोडले असल्यास संबंधितांवरही कारवाई करा;...