‘पुण्याला आपलं घर मानणारा, पुणेकरांसाठी निर्मळ आणि निस्वार्थी मनाने झटणारा’ अशा शब्दांत महापालिका आयुक्तांचे कौतुक
पुणे | माय मराठी प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांचे कौतुक करणारे भव्य होर्डिंग शहरातील बालगंधर्व चौकात झळकले असून, या होर्डिंगने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. महापालिका आयुक्तांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या होर्डिंगवरील मजकूर विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
‘पुण्याच्या संस्कृतीला साजेसा, पुण्याला आपलं घर मानणारा आणि पुणेकरांसाठी निर्मळ, निस्वार्थी मनाने झटणारा पुण्याचा आपला आयुक्त’ अशा शब्दांत या होर्डिंगवर आयुक्तांचे कौतुक करण्यात आले आहे.
पुण्यातील बालगंधर्व चौकासारख्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या या भव्य होर्डिंगवर आयुक्तांचे छायाचित्रही झळकत आहे.
सर्वसाधारणपणे शहरात राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणारे होर्डिंग्ज पाहायला मिळतात. मात्र, यावेळी थेट महापालिका आयुक्तांच्या कामकाजाचे कौतुक करणारा होर्डिंग झळकल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत होर्डिंग्ज आणि विविध नागरी प्रश्नांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू असतानाच आयुक्तांच्या कार्याचे अशा पद्धतीने सार्वजनिक कौतुक करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ‘पुण्याला आपलं घर मानणारा’ आणि ‘पुणेकरांसाठी निस्वार्थी मनाने झटणारा’ या शब्दांतून आयुक्तांच्या पुण्याशी असलेल्या नात्याचे आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे.
आता बालगंधर्व चौकातील हे भव्य होर्डिंग नेमके कोणी लावले, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

