पुणेकरांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या जागेचा पाठपुरावा…

Date:

📍नवी दिल्ली

पुणे शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी खडकवासला येथे प्रस्तावित २०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या (CWPRS) मालकीची सुमारे ४ हेक्टर जागा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.

मोहोळ या संदर्भात म्हणाले,’ पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या १२ गावांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता, पुणे महानगरपालिकेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन केले आहे. सुमारे ८९० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (DPR) केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने ११ मे २०२६ रोजी मंजुरी दिली आहे.

नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अलीकडे गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनला आहे. जलजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

प्रकल्पासाठी खडकवासला येथील CWPRS ची जागा तांत्रिकदृष्ट्या सर्वाधिक योग्य असून, जागेच्या हस्तांतरणासाठी जलशक्ती मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे या प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी देऊन प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करावा, अशी विनंती सी. आर. पाटील यांना केली.असे सांगून मोहोळ पुढे म्हणाले,’पुणेकरांचे आरोग्य, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, हाच यामागचा उद्देश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या जवानांसोबत भाऊबीज साजरी

खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात सैनिकांसोबत भाऊबीज :...

एफसी रस्त्यावरील अतिक्रमणांना कायमचा आळा घालणार; सभागृहनेते गणेश बिडकर मैदानात!

मुख्यसभेतील गदारोळ आणि अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर बिडकरांची प्रत्यक्ष पाहणी; ‘एक...

पुणे महापालिकेच्या शाळांचा होणार कायापालट; ३४ कोटी ६४ लाखांच्या विकासकामांना मंजुरी!

चार परिमंडळांतील शाळा बनणार आदर्श; पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी स्थायी...