जाहिरात क्रमांक १३/२०२६ प्रसिद्ध; पात्र उमेदवारांना ४ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी
नवी दिल्ली, दि. १६ नोव्हेंबर २०२६ (माय मराठी वृत्तसेवा) :
केंद्र सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदांवर थेट भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. आयोगाने यासंदर्भात जाहिरात क्रमांक १३/२०२६ प्रसिद्ध केली असून, इच्छुक उमेदवारांना ४ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारांनी आयोगाच्या https://upsconline.nic.in या अधिकृत अर्ज पोर्टलवरून अर्ज सादर करावेत.
भरतीसंदर्भातील पदनिहाय माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि इतर अटी व शर्ती आयोगाच्या https://upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या जाहिरातीत देण्यात आल्या आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. संबंधित पदासाठी आवश्यक पात्रतेची खातरजमा करूनच अर्ज भरावा, असे आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगाने केले आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ डिसेंबर २०२६ असल्याने पात्र उमेदवारांनी मुदतीत अर्ज सादर करावेत.
भरतीची महत्त्वाची माहिती
अर्ज सुरू
| जाहिरात क्रमांक | १३/२०२६ |
| अर्ज सुरू | १४ नोव्हेंबर २०२६ |
| अंतिम तारीख | ४ डिसेंबर २०२६ |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |

