महावितरण संचालकांची वीज कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी

Date:

संचालक धनंजय औंढेकर यांची गणेशाम वीज उपकेंद्राला सदिच्छा भेट

पुणे, : दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी पिंपरी विभागातील गणेशाम वीज उपकेंद्राला सदिच्छा भेट देऊन तेथील वीज कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सणासुदीच्या काळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.

वीजबिलांची शंभर टक्के वसुली, वीजगळती कमी करणे आणि ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर श्री. औंढेकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. वीज यंत्रणेतील बिघाड, त्यावरील उपाययोजना आणि स्थानिक परिस्थितीची अचूक माहिती लाइनमनला असते. त्यामुळे त्याने ठरवले आणि जबाबदारीने काम केले, तर महावितरणच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता त्याच्यात आहे, असे त्यांनी नमूद केले.

उपकेंद्रातील कार्यक्रमात श्री. औंढेकर यांनी उपस्थित लाइनमन आणि यंत्रचालकांना (ऑपरेटर) दिवाळी व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या सणात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. सणाच्या दिवशीही कुटुंबीयांपासून दूर राहून जनतेच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचा त्यांनी गौरव केला. या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधणे, हा या भेटीमागील उद्देश होता.

या सदिच्छा भेटीमुळे वरिष्ठ अधिकारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांच्यातील संवाद व स्नेहबंध अधिक दृढ झाले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानदेव तरंगे यांचेसह वीज कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबाराचा कट? दिल्ली पोलिसांनी दोन शार्पशूटरना अटक केल्याने खळबळ!

मुंबईत थांबून गोळीबार करण्याच्या सूचना दिल्याचा तपासात दावा; पंजाबमधील...

बांधवगड येथे ‘श्रीमती इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटर’चे भूमिपूजन

वन कर्मचारी आणि वन्यजीव संरक्षणासाठी 'पुनीत बालन ग्रुप'कडून भरीव...

हजारो पुणेकर धावले जोशात अन् उत्साहात; राष्ट्रीय एकता दौडीतून ‘नशामुक्त युवा भारताचा’ संदेश!

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पुण्यात भव्य मॅरेथॉन;...