कुंभमेळ्याच्या नावाखाली फडणवीस सरकारचा मोठा भ्रष्टाचार, ३६ हजार कोटींच्या निधीत ५० टक्क्यांची मलई: हर्षवर्धन सपकाळ

Date:

भाजपा-महायुती सरकारने भ्रष्टाचारासाठी पवित्र कुंभमेळाही सोडला नाही, देवेंद्र फडणवीसांकडून भ्रष्टाचारासाठी विशेष मंत्र्याची नियुक्ती.

राज्यातील सहकार क्षेत्रच मोडीत काढण्याचा भाजपा महायुती सरकारचा डाव, गोकुळमध्ये आडमार्गाने सत्ता मिळवण्यासाठी कायदा बदलला: बाळासाहेब थोरात.

उत्तर महाराष्ट्र विभागातील लोकसभा,विधानसभा, जिल्हा प्रभारी व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक नाशिक मध्ये संपन्न.

नाशिक, दि, ५ नोव्हेंबर २६
नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी महायुती सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून नाशिकमध्ये विकासकामे केली जात असल्याचा सरकारचा दावा आहे पण प्रत्यक्षात या निधीतून जास्तीत जास्ती मलई खाण्याचे काम होत आहे. २२ कोटी रुपये मंडपावर खर्च केले जात आहेत, ३ कोटी रुपये हेलिपॅडवर खर्च केला जात आहे. ३५० कोटी रुपये सीसीटीव्हीवर खर्च करण्यात येत आहेत. विकासकामांच्या नावाखाली पद्धतशिरपणे भ्रष्टाचार केला जात असून तब्बल ५० टक्के मलई खाल्ली जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

उत्तर महाराष्ट्र विभागातील लोकसभा प्रभारी, विधानसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडली. यावेळी CWC सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार शोभा बच्छाव, AICC चे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, शरद आहेर, अभिजित सपकाळ आदी उपस्थित होते. नाशिकमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांचे एक शिबिर संपन्न झाले होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले होते, त्याच अजेंड्याचे पुनरावलोकन या बैठकीत करण्यात आले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, समुद्रमंथनानंतर जेव्हा अमृताचा कुंभ निघाला, तेव्हा या कुंभातून अमृताचे थेंब पृथ्वीवरील ज्या चार ठिकाणी सांडले, त्यातील नाशिक हे एक ठिकाण आहे, या ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळा होत असतो. पण देवेंद्र फडणवीस सरकार या कुंभमेळ्याच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे विष पेरत आहेत, या विषाची फळे त्यांना चाखावी लागतील. नाशिकमध्ये कोणतेही काम अद्याप पर्ण झालेली नाही, नाशिककर त्रस्त झाला आहे, बोगास वर्क ऑर्डर काढल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारासाठी एका मंत्र्याला नियुक्त केले आहे. भाजपा-महायुती सरकारने भ्रष्टाचारासाठी पवित्र असा कुंभमेळाही सोडला नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, भारतीय जनता पक्ष सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्तेसाठी जे केले तेच आता सहकार क्षेत्रातही करत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत असतानाही कोरमचा मुद्दा पुढे करत अध्यक्षाची निवड होऊ दिली नाही. ज्याचे बहुमत त्याचा अध्यक्ष निवडीचा अधिकार असतो. सरकारने कोरमचा नियम बदलला पाहिजे पण नवा कायदा करून ते आडमार्गाने गोकुळची सत्ता हस्तगत करत आहेत. सरकार नियुक्त ४ सदस्य नियुक्त करण्याचा अत्यंत चुकीचा प्रकार सरकारने सुरु केला आहे. हा कायदा संपूर्ण सहकार क्षेत्रातील संस्थांसाठी लागू होईल. भाजपा महायुती सरकार सहकार क्षेत्रच मोडीत काढण्यास निघाले आहे, या पापाचे धनी मुख्यमंत्र्यांनी होऊ नये असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या ६७ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन; दिव्यांग विद्यार्थी व तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना दिवाळी फराळ वाटप

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संघटनेचे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी मांडला वर्षभराच्या...

अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या गीतांनी साजरी झाली महात्मा फुले यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष

पुणे, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या...

पुणे महापालिकेच्या शाळांसाठी ९.६३ कोटी; आशा सेविकांना १० हजारांचे दिवाळी बक्षीस, विद्यार्थी दिनही शहरभर साजरा होणार!

मानधनावरील शैक्षणिक कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बक्षीस; लाभार्थी व्यवस्थापन प्रणालीसाठी ६९.५६...