पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त

Date:

पुणे, दि. ५ : पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरातील राहुल एजन्सीज या दुकानात परवान्याशिवाय साठवून ठेवलेला ६५ लाख ३४ हजार ४२८ रुपये किमतीचा कीटकनाशकांचा बेकायदेशीर साठा कृषी विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी दुकानमालक राहुल साहेबराव निकम याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) निलेश गवरी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल गणपतराव जाधव आणि गुण नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी, पंचायत समिती हवेली येथील सुनील सिताराम रुपनर यांनी १४ व १५ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवाजी रोड, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ येथील राहुल एजन्सीज या दुकानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान दुकानाच्या परवान्यामध्ये नोंद नसलेला तसेच आवश्यक परवानगीशिवाय साठवून ठेवलेला कीटकनाशकांचा मोठा साठा आढळून आला. याप्रकरणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये डेल्टामेथ्रिन, इमिडाक्लोप्रिड, क्लोरपायरीफॉस, फिप्रोनिल, सायपरमेथ्रिन यांसह विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचनामा करून कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून संबंधित साठ्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेकायदेशीर कृषी निविष्ठांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेच्या बांधकामस्थळांवर सुरक्षा नियमांची सक्ती; त्रुटी आढळल्यास काम बंद करण्याचे आदेश!

दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे परिपत्रक;...

कुंभमेळ्याच्या नावाखाली फडणवीस सरकारचा मोठा भ्रष्टाचार, ३६ हजार कोटींच्या निधीत ५० टक्क्यांची मलई: हर्षवर्धन सपकाळ

भाजपा-महायुती सरकारने भ्रष्टाचारासाठी पवित्र कुंभमेळाही सोडला नाही, देवेंद्र फडणवीसांकडून...

_महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष_

परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा! महात्मा ज्योतिबा फुले...