सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा मिळणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत – सुनेत्राताई पवार

Date:

पानमंदवाडीतील ५ मेगावॅट सौर प्रकल्पाचे लोकार्पण; २५०४ शेतकऱ्यांना दिवसा वीज

पुणे, दि. ४ नोव्हेंबर २०२६ : शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी, दिवसा वीज, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतमालासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींवर शासन सातत्याने काम करत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी चाकण येथे केले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत खेड तालुक्यातील पानमंदवाडी येथे उभारण्यात आलेल्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी (दि. ४) उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ऑनलाईन बटण दाबून करण्यात आले. चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी हा सोहळा झाला. या प्रकल्पामुळे कडूस वीज उपकेंद्रांतर्गत २५०४ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

शेतीच्या विकासासाठी केवळ पाणी उपलब्ध असणे पुरेसे नाही, तर दिवसा आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळणेही आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यभरात विकेंद्रित स्वरूपात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांमधून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी सिंचनासाठी शेतात जाण्याची गरज कमी होणार असल्याने बिबट्या तसेच अन्य वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

पानमंदवाडी येथील या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी अवाडा कंपनीने केली असून, त्यासाठी सुमारे २० कोटी ७५ लाख रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पात निर्माण होणारी वीज सुमारे ५.८ किलोमीटर लांबीच्या ११ केव्ही वाहिनीद्वारे ३३ केव्ही कडूस उपकेंद्रापर्यंत आणण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सौरऊर्जेची निर्मिती करून तिचा उपयोग शेतीपंपांसाठी करण्यात येणार आहे.

कडूस उपकेंद्रांतर्गत एकूण ८ हजार ६४३ वीजग्राहक असून, त्यामध्ये २५०४ कृषी ग्राहकांचा समावेश आहे. वाढत्या विजेच्या मागणीचा विचार करून उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त उच्चदाब रोहित्र बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उपकेंद्राची एकूण क्षमता १५ एमव्हीए होणार आहे.

यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील आणि चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनिषा गोरे उपस्थित होत्या. महावितरणतर्फे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी तसेच अवाडाचे फतेह सिंग आणि मुर्तुजा काझी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे की केवळ घोषणांपुरताच आदर? : डॉ. नीलम गोऱ्हे

लोकशाही बचाव आंदोलनात महिला खासदाराला चापट मारल्याच्या कथित प्रकारावरून...