दिवाळीच्या स्वच्छतेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; कसबा मतदारसंघात तब्बल २० टन घरगुती वस्तूंचे संकलन

Date:

आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून कसब्यात अनोखा उपक्रम; २ हजार कुटुंबांचा सहभाग

पुणे (दि १ ): दिवाळीच्या निमित्ताने घराघरांत होणाऱ्या स्वच्छतेतून निर्माण होणाऱ्या जुन्या आणि अनावश्यक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच त्यांचा पुनर्वापर व्हावा, या उद्देशाने कसबा विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आलेल्या विशेष संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २ हजार कुटुंबांनी सहभाग नोंदवित सुमारे २० टन घरगुती वस्तू जमा केल्या. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात आले.

दिवाळीच्या स्वच्छतेनंतर अनेक घरांमध्ये जुने साहित्य अनावश्यक ठरते. या वस्तू कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर व्हावा, तसेच गरजू व्यक्तींना त्याचा लाभ मिळावा, या विचारातून नऊ संकलन केंद्रांवर वस्तूंचे संकलन करण्यात आले. नागरिकांनी जुने टीव्ही, कूलर, सायकली, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, कपडे, चादरी, भांडी, पादत्राणे, पुस्तके, खेळणी आणि फर्निचर अशा विविध वस्तू जमा केल्या.

यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले “दिवाळीच्या स्वच्छतेला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा आजचा उपक्रम हे स्वच्छ सुंदर विकसित कसबासाठी महत्वाचे पाऊल आहे. वापरण्यायोग्य वस्तूंचा पुनर्वापर, कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि गरजूंपर्यंत वस्तू पोहोचविणे, या तिन्ही उद्देशांची सांगड या उपक्रमातून घालण्यात आली. नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेची जबाबदारी सामूहिक असल्याचा संदेश या माध्यमातून दिल्यात आला”.
जुना टीव्ही, सायकल तसेच कपडे घरामध्ये पडून होते. मात्र त्या फेकून देण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो. या उपक्रमामुळे जुन्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. – दिपक खेवलेकर, नवी पेठ

दिवाळीच्या स्वच्छतेमध्ये घरातील जुने कपडे, भांडी, चादरी, खेळणी आणि इतर वापरण्यायोग्य वस्तू जमा केल्या. या वस्तू दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी पडतील, याचा आनंद आहे. – शकुंतला तावरे, कसबा पेठ

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महामार्गाच्या कामात वीजवाहिन्यांचे नुकसान; NHAI च्या कामावर महावितरणचा आक्षेप

वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान वारंवार केबलचे नुकसान; कंत्राटदाराविरोधात...

पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला २०२६-२७ चा ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ प्रदान

तब्बल २ हजार ७०१ शाळांमधून ‘पिलर ऑफ व्हॅल्यूज’ या...

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यानंतर ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सक्रिय; राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचना !

सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाट यांच्या विभागांतर्गत महामंडळाच्या व्यवस्थापकीय...