उत्कृष्ट कार्याची दखल, उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन आणि संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचवण्यासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’
मुंबई-
विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश/केंद्रीय सशस्त्र पोलीस दले /केंद्रीय पोलीस संघटनांमधील 490 कर्मचाऱ्यांना वर्ष 2026 साठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ जाहीर करण्यात आले आहे. हे पदक उत्कृष्ट कार्याची दखल घेणे, उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देणे आणि संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचवण्यासाठी दिले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावेल.
केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 फेब्रुवारी 2024 रोजी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ साठी अधिसूचना जारी केली होती. पोलीस दल, सुरक्षा संस्था, गुप्तचर विभाग, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या शाखा/विशेष शाखा, केंद्रीय पोलीस संघटना/केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/राष्ट्रीय सुरक्षा गार्ड/आसाम रायफल्स आणि देशभरातील न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी, तपास कार्यात उल्लेखनीय सेवा, अपवादात्मक कार्यक्षमता, अत्यंत धाडसी गुप्तचर सेवा बजावणाऱ्यांना तसेच न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रात कार्यरत सरकारी वैज्ञानिक म्हणून प्रशंसनीय कार्य करणाऱ्यांना हे पदक देऊन गौरवण्यात येते.
हे पदक दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केले जाते.
पुरस्काराने सन्मानित कर्मचाऱ्यांची यादी गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे – https://www.mha.gov.in (पुरस्कार विजेत्यांच्या यादीसाठी येथे क्लिक करा)
महाराष्ट्र पोलीस दलातील १७ अधिकारी-कर्मचारी आणि न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रातील एक अधिकारी, अशी एकूण १८ जणांना पुरस्कार
| नाव | पद |
|---|---|
| कुमार चिंता | सहायक पोलीस अधीक्षक |
| ऋषिकेश रेड्डी | पोलीस अधीक्षक |
| रामेश्वर रेंगे | सहायक पोलीस आयुक्त |
| माणिक बेद्रे | पोलीस निरीक्षक |
| डॉ. एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी | सहायक पोलीस अधीक्षक |
| प्रभावती एकुरके | पोलीस निरीक्षक |
| रितेश आहेर | पोलीस निरीक्षक |
| ईश्वर काटकडे | अतिरिक्त पोलीस अधीक्षक |
| रामचंद्र मोहिते | पोलीस निरीक्षक |
| अश्विनी अभिजित पाटील | पोलीस निरीक्षक |
| पूजा गायकवाड | पोलीस उपअधीक्षक |
महाराष्ट्राच्या विशेष मोहिमेतील सात मानकऱ्यांमध्ये शिवप्रसाद बाळासाहेब पठारे, अमोल माधव माळी, रामदास तात्याबा कदम, स्वप्नील रामदास काळे यांचीही नावे आहेत.

