उड्डाणपुलाचे काम सुरु असताना मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

Date:

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त; चौकशीचे निर्देश

प्रशासनाकडून तातडीने बचाव व मदतकार्य

पुणे, दि. ३० : इंदापूर तालुक्यातील मौजे राजवडी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना माती-मुरुमाचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, एक मजूर जखमी झाला आहे. जखमी मजुराला तातडीने बाहेर काढून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

आज, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना अचानक माती-मुरुमाचा ढिगारा कोसळला. त्यावेळी घटनास्थळी तीन मजूर काम करीत होते. त्यापैकी एका मजुराने प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतली. उर्वरित दोन मजुरांपैकी एकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर एका मजुराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव व मदतकार्य हाती घेऊन जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाकडून घटनेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे जिल्ह्यात पीएम किसान योजनेतून १,९३७ कोटींचा लाभ

४.३४ लाख शेतकरी पात्र; २४ व्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र...

जोशीमठजवळ हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह सहा जण होते प्रवासात!

बद्रीनाथहून डेहराडूनकडे जाताना संपर्क तुटला; मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी...

भारतीय नौदलाची ताकद वाढणार! ८ अत्याधुनिक युद्धनौकांसाठी ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार होणार स्टेल्थ कॉर्व्हेट युद्धनौका; कोलकाता आणि...

उत्तराखंडमध्ये सहा जणांसह हेलिकॉप्टर बेपत्ता; जोशीमठजवळ दुर्घटनेची भीती!

बद्रीनाथहून परतताना संपर्क तुटला; खराब हवामानाचा संशय, SDRF आणि...